---Advertisement---

फिफा विश्वचषक २०१८: फ्रांसचा ऑस्ट्रेलियावर विजय

---Advertisement---

रशिया।  फिफा विश्वचषकात आज गट क मधील फ्रांस विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात फ्रांसने ऑस्ट्रेलियाला 2-1ने पराभूत केले.

फ्रांस कडून फॉरवर्ड एंटोनी स्कॉझमनने 58व्या मिनीटाला आणि पॉल पोग्बाने 81व्या मिनीटाला गोल केला.

ऑस्ट्रेलियाकडून 33 वर्षीय मिडफिल्डर माईल जेडिनकने या 62व्या मिनीटाला गोल केला.

75व्या मिनीटाला सामना बरोबरीत असताना फ्रांसचा सेंट्रल मिडफिल्डर कोरेंटिन टॉलिसोला पंचानी पिवळे कार्ड दाखवले.

फ्रांसचा संघ 4-3-3 आणि ऑस्ट्रेलियाचा संघ 4-2-3-1 या फॉर्मेशनने मैदानात उतरले.

1998 चा फिफा विश्वचषक विजेता फ्रांस फिफा क्रमवारीत 7व्या स्थानावर तर ऑस्ट्रेलिया 36 व्या स्थानावर आहे.

तसेच ऑस्ट्रेलियाचा हा पाचवा विश्वचषक आहे. त्यांच्या फुटबॉल संघाला सॉसरोजीओस या नावानेही ओळखले जाते.

आजच्या सामन्याचा एंटोनी स्कॉझमन सामनावीर ठरला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment