---Advertisement---

स्कॉटलंडची टी२०त प्रशंसनीय कामगिरी, फ्रान्सला अवघ्या २४ धावांवर गुंडाळत ७ विकेट्सने जिंकला सामना

On: मंगळवार, ऑगस्ट 31, 2021 9:38 AM
---Advertisement---

टी-20 क्रिकेटच्या माध्यमातून आता हळूहळू अनेक देश क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. क्वचित एखादा अपवाद सोडला तर यापूर्वी असे कुठेही दिसले नव्हते. अमेरिकेपासून आफ्रिका आणि युरोपपर्यंत सर्व छोट्या-मोठ्या देशांनी क्रिकेटमध्ये हात आजमावायला सुरुवात केली आहे. दरम्यान महिला टी-20 विश्वचषक 2023 साठी फ्रान्स आणि स्कॉटलंडच्या संघांमध्ये सोमवारी (30 ऑगस्ट) पात्रता फेरी सामना खेळला गेला.

कोलंबियाच्या कार्टाजेना येथे खेळल्या गेलेल्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषक युरोपियन विभाग पात्रता फेरीत फ्रान्स आणि स्कॉटलंडचे संघ समोरासमोर उभे ठाकले होते. या सामन्यात स्कॉटलंडच्या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा निर्णय योग्यही ठरला. स्कॉटलंडच्या गोलंदाजांनी फ्रान्सचा संपूर्ण संघ 17.4 षटकांत केवळ 24 धावांवर गुंडाळला. या दरम्यान फ्रान्सची एकही फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकली नाही. त्यापैकी 4 फलंदाज तर शून्यावर बाद झाल्या.

यादरम्यान स्कॉटिश गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मेगन मॅकलने स्कॉटलंडकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या. नंतर ती ‘सामनावीर’ देखील ठरली. मॅकलनने 4 षटकांत फक्त 3 धावा देत 5 बळी घेतले. तिच्याव्यतिरिक्त एबी ड्रमॉन्डने 3 धावांत 2 तर हॅना रेनीने 5 धावांत 1 बळी घेतला.

जिंकण्यासाठी स्कॉटलंड संघासमोर अवघ्या 25 धावांचे लक्ष्य होते. जे त्यांनी केवळ 2.2 षटकांत म्हणजे अवघ्या 14 चेंडूत कोणताही विलंब न करता पार केले आणि 7 विकेट्सने सामना खिशात घातला. मात्र, दरम्यान स्कॉटलंडनेही आपल्या 3 विकेट गमावल्या. या सामन्यात हे फ्रान्स संघाचे एकमेव यश मानता येईल.

विशेष म्हणजे, महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आतापर्यंतची ही सर्वात कमी धावसंख्या नाही. याआधी वर्ष 2019 मध्ये बांगलादेश संघाने मालदीवला 6 धावांवर सर्वबाद केले होते. तर रवांडाच्या संघाने 2019 मध्ये मालदीवच्या संघाला 6 धावांवर बाद केले होते. ही आतापर्यंतची महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्या आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ओमानविरुद्ध जयस्वालची ‘यशस्वी’ खेळी; मुंबईने ४ विकेट्सने जिंकला पहिला वनडे सामना

ओव्हल कसोटीत अश्विन आणि शार्दुलचे पुनरागमन? ‘अशी’ असू शकते भारताची संभाव्य प्लेइंग ११

‘क्रिकेटचे द्रोणाचार्य’ वासू परांजपे काळाच्या पडद्याआड; गावसकर, तेंडुलकरसारख्या दिग्गजांना केले होते मोलाचे मार्गदर्शन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---