फिफा विश्वचषक विजेत्या फ्रान्सचा स्ट्रायकर कायलिन एमबाप्पे हा पाठीच्या दुखापतीने त्रस्त असताना सुद्धा उपांत्य आणि अंतिम सामना खेळला.
बेल्जियम विरुद्धच्या सामन्यात खेळण्यापूर्वीच त्याला पाठीचा त्रास जाणवत होता. या उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सने बेल्जियमला 1-0 आणि अंतिम सामन्यात क्रोएशियाला 4-2 ने पराभूत केले.
तसेच एमबाप्पेने शेवटच्या सामन्यातील 4 पैकी एक गोल केला आहे.
19 वर्षीय एमबाप्पेला 2018च्या फिफा विश्वचषकाचा ‘सर्वोत्तम युवा खेळाडू’चा पुरस्कार मिळाला आहे. त्याने या स्पर्धेत सात सामन्यात खेळताना एकूण चार गोल केले आहेत.
त्याने क्रोएशिया विरुद्धच्या सामन्यात गोल केल्याने ब्राझिलचा दिग्गज फुटबॉलपटू पेलेनंतर गोल करणारा कमी वयाचा खेळाडू ठरला.
एमबाप्पे हा पॅरीस सेंट-जर्मन कडून फ्रेंच लीगमध्ये खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–फिफाच्या बेस्ट प्लेअर २०१८च्या यादीत ह्या मोठ्या खेळाडूचे नावच नाही
–फिफा 2018च्या सर्वोत्कृष्ठ पुरूष खेळाडूंच्या नामांकनात फक्त एकच डिफेंडर