फीफा विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (दि. 18 डिसेंबर) कतारमधील लुनेेल स्टेडीयम येथे खेळवला गेला. या चित्तथरारक सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केला. हा सामना संपल्यानंतर मैदानावर तिन्ही विश्व जिंकल्याचा आनंद आणि अनावर झालेेले दुख: या दोन्ही भावना बघायला मिळाल्या. एका बाजुला अर्जेंटिनाचा संघ जल्लोष करत होता तर दुसऱ्या बाजुला फ्रांसच्या संघातील खेळाडूंना अश्रू अनावर झाले. अगदी जीव तोडून बरोबरीत आणलेला सामना हातून निसटल्याने खेळाडू जमिनीवर पडून रडू लागले. फ्रांससाठी महत्वाचे 3 गोल करणारा किलीयन एम्बाप्पे मैदानावर उदास बसेलला. त्याला उदास बसलेले पाहून फ्रान्सचेे पंतप्रधान स्टेडीयममधून खाली उतरुन त्याच्या जवळ गेले आणि एम्बाप्पेला मिठी मारली.
अंतिम सामना संपला तेव्हा फ्रान्सच्या खेळाडूंच्या तोंडचेे पाणी पळाले होतेे. साहाजिक आहे की तोंडाशी आलेला घास पळाल्याने प्रत्येक खेळाडू उदास झालेला. अशातच फ्रान्सचेे राष्ट्रपती ईमॅन्युएल मॅक्रॉन स्टेडीयमधून खाली आलेे. त्यांनी खाली येताच संघासाठी तीन महत्वाचे गोल करणाऱ्या किलीयन एम्बाप्पे याला धिर दिला आणि सांत्वन करत त्याला मिठी मारली. त्यांच्यातील हा भावनिक क्षण सोशल मिडीयावर प्रंचंड व्हायरल झाला. सामना संपल्यानंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर झाला.
नेता हो तो फ्रांस के राष्ट्रपति मैक्रों जैसा… FIFA में फ्रांस की हार के बाद खिलाड़ियों का हौसला बढ़ाने पहुंचे….खेल में जबरदस्त करने वाले एम्बाप्पे को सीने से लगाया@EmmanuelMacron#FIFAWorldCup #ArgentinaFrancia #ArgentinaVsFrance pic.twitter.com/mOAdG97J2O
— Yogesh Tiwari (@_yogeshtiwari) December 19, 2022
फीफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्स आणि अर्जेंटिना एकमेकांना भिडले. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाने 2-0ची मोठी आघाडी घेतली होती. कर्णधार लिओनल मेस्सी याने 23व्या मिनीटाला आणि ऐंजल डी मारियो याने 36व्या मिनीटाला गोल केला होता. 79 मिनिटाप्रर्यंत फ्रान्सने एकही गोल केेलला नव्हता. त्यानंतर मैदानात एक चमत्कार बघायला मिळाला, ज्याने सर्वाचेंच डोळेे विस्फारले. फ्रान्सच्या एम्बाप्पेने 80व्या आणि 81व्या मिनीटाला गोल करत सामना बरोबरीत आणला. निर्धारित वेळेत 2-2 अशी बरोबरी झाल्याने 30 मिनीटांचा अधिकचा वेळ देण्यात आला. त्यानंतर मेस्सीने 108व्या मिनीटाला गोल करत आघाडी मिळवली पण एम्बाप्पेने 108व्या मिनीटाला गोल केला आणि सामना पुन्हा 3-3नेे बरोबरी झाली. त्यानंतर सामन्याचा निकाल पेेनाल्टी शुटआऊटने ठरवण्यात आला. या पेनाल्टी शुटआऊटमध्ये अर्जेंटिनाने 4-2ने फ्रांसचा पराभव केला.(France’s president Emmanuel Macron gave patience to Kylian Mbappe after lossing FIFA World cup final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मेस्सीने चाहत्यांना दिलेला शब्द मोडला! विश्वचषक जिंकताच बदलला निर्णय
अर्जेंटिनाच्या विश्वविजयाचे स्वप्न साकार करणारा मार्टिनेझ ठरला गोल्डन ग्लोव्हजचा मानकरी; अशी आहे आजवरची यादी