जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्ट (Usain Bolt) मोठ्या आर्थिक फसवणुकीचा शिकार बनला आहे. त्याने आतापर्यंत कमावलेली सर्व संपत्ती ऑनलाईन माध्यमातून चोरीला गेली आहे. जमैकाचा धावपटू आणि ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता उसेन बोल्ड याच्या खात्यातून 12.7 मिनियन डॉलर्स चोरी केल्याचे सांगितले जात आहे. आपण अनेकदा सायबर स्कॅमविषयी ऐकले असेल, पण बोल्टसारख्या एकाद्या मोठ्या व्यक्तीसोबत असा प्रकार पहिल्यांदाच घडला असावा.
माध्यमांतील वृत्तांनुसार उसेन बोल्ट (Usain) याच्या खात्यातील 80% रक्कम अचानक गायब झाली. किग्स्टन स्थित स्टॉक्स एन्ड सिक्योरिटीज लिमिटेड बाँकेत त्याचे आकेत होते. बोल्टच्या वकिलांकडून या प्रकरणाची सविस्तर माहिती मिळाली. बोल्टचे वकील लिंटन पी. गॉर्डन यांनी दिलेल्या माहितीनुसार धावपटूच्या खात्यातून 12 मिलियन डॉलर्स गायब झाले आहेत. गरज पडली तर बोल्ट या प्रकरणासाठी न्यायालयात जाणार आहे. त्याच्या खात्यात आता फक्त 12 हजारा डॉलर्स शिल्लक राहिल्याचे सांगितले जात आहे.
Deafening Silence
— Usain St. Leo Bolt (@usainbolt) January 19, 2023
“खात्यात बोल्टच्या सेवानिवृत्तीची आणि आयुष्यभराची कमावीचा भाग होता. ही कोणासाठीही चिंता वाढवणारी बातमी आहे. जर कंपनीने रक्कम परत केली नाही, तर आम्ही या प्रकणासाठी न्यायालयात धाव घेऊ. हे प्रकरण गंभीर असून बोल्टाला त्याची रक्कम परत मिळेल आणि प्रकरणचा शेवट होईल.” दरम्यान 12 जानेवारी रोजी स्टॉक्स एन्ड सिक्योरिटीज लिमिटेड कंपनीकडून माहिती दिली गेली होती की, त्यांच्या एका कर्मचाऱ्याकडून आर्थिक गैरव्यावहार झाल्याचे समोर येत आहे. कंपनीने या कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई केल्याचेही सांगितले होते. जमैका कॉन्स्टेबुलर फोर्स सध्या या प्रकरणात संशयित कर्मचाऱ्याची चौकशी करत आहे.
उसैन बोल्टचे क्रीडा श्रेत्रातील योगदान पाहता ते जबरदस्त राहिले आहे. त्याने जमैका राष्ट्राचे प्रतिनिधित्व करत ऑलिम्पिकमध्ये एकूण 8 सुवर्णपदक पटकावले आहेत. बोल्ट त्याच्या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. अशात त्याच्यासारख्या मोठ्या व्यक्तीसोबत झालेला हा गैरव्यावहार सर्वसामन्यांसाची देखील चिंता वाढवणारा ठरत आहे. (Fraud with Usain Bolt, 12 million stolen from bank account)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केवळ इतके कोटी घेऊन लिलावात उतरणार महिला आयपीएलचे संघ, पुरुष आयपीएलच्या तुलनेत…
‘पंत फक्त उपस्थित असला तरी…’, दिल्लीच्या प्रशिक्षकांकडून दुखापतग्रस्त यष्टीरक्षकाला मैदानात आमंत्रण