पॅरीस। फ्रेंच ओपन 2018 मध्ये आज सिमोना हालेप विरुद्ध स्लोअन स्टिफन्स यांच्यात महिला एकेरीचा अंतिम सामना रंगणार आहे.
अव्वल मानांकित हालेपने तिच्या कारकिर्दीत चौथ्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. तिने उपांत्य फेरीत गॅब्रिएन मुगुरुझाचा 6-1,6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
आत्तापर्यंत हालेपने खेळलेल्या तीनही अंतिम सामन्यात तीला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे ती यावेळी पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक असेल.
तिने याआधी दोनवेळा फ्रेंच ओपनचीच अंतिम फेरी गाठली आहे. तर यावर्षी ती आॅस्ट्रेलियन ओपनची उपविजेती ठरली.
तसेच अमेरिकेच्या स्लोअन स्टिफन्सने फ्रेंच ओपनच्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्याच मॅडिसन कीजचा 6-4,6-4 अशा फरकाने पराभव करत अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला.
10 वे मानांकन असणाऱ्या स्टिफन्सने मागिल वर्षी अमेरिकन ओपनचे विजेतेपद मिळवले आहे. यावेळीही तिने मॅडिसन कीजचाच पराभव करत हे विजेतेपद मिळवले होते.
तिला 2016 च्या रिओ आॅलिंपिक नंतर पायाच्या दुखापतीमुळे जवळ जवळ 1 वर्ष टेनिसपासून दूर रहावे लागले होते. पण तिने अमेरिकन ओपन 2017चे विजेतेपद मिळवत दमदार पुनरागमन केले होते.
हालेप आणि स्टिफन्स यांच्यात आत्तापर्यंत 7 सामने झाले आहेत. यात 5 सामन्यात हालेपने बाजी मारली आहे तर 2 सामन्यात स्टिफन्सने विजय मिळवला आहे.
या दोघींनीही अजून फ्रेंच ओपनचे विजेतेपद मिळवले नसल्याने आज महिला एकेरीत फ्रेंच ओपनला नविन विजेती मिळणार आहे.
वाचा- मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- १: मुंबईतील क्रिकेटचा इतिहास आणि मूलभूत जडणघडण
महत्त्वाच्या बातम्या:
–कोहलीच्या दाढीच्या इन्शुरन्सबद्दलच्या चर्चा भंपक!
–संघ बदलुनही अनुप कुमारच्या नावावर होणार असा विक्रम जो कुणालाही मोडणं केवळ अशक्य!
–फिफा विश्वचषकाच्या थीम साॅंगला तब्बल ३८ मिलीयन विव्ज!
–अर्जेंटीनाच्या फुटबाॅल चाहत्यांसाठी ही नक्कीच चांगली बातमी नाही
–मुंबईत रंगणार भारत विरुद्ध केनिया फूटबॉलच्या अंतिम सामन्याचा थरार