-आदित्य गुंड
फ्रेंच ओपन २०२० च्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत आज राफेल नदाल व नोवाक जोकोविच एकमेकांशी भिडणार आहेत. दोघांमधला हा एकूण ५६ वा सामना आहे. तर ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये ते १५ व्यांदा आमने सामने येत आहेत. ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत ८ व्यांदा ते एकमेकांचा सामना करत आहे.
जे जिंकेल ते विक्रम करणार-
जर आज जोकोविच जिंकला तर हे त्याचे १८ वे ग्रँडस्लॅम असेल. राफा जिंकला तर हे त्याचे २० वे ग्रँडस्लॅम तर १३ वे फ्रेंच ओपन विजेतेपद असेल. फ्रेंच ओपनमधील हा त्याचा १०० वा विजय असेल. त्याचा फ्रेंच ओपनचा रेकोर्स ९९ विजय आणि २ पराभव असा आहे.
इतिहास काय सांगतो-
राफाला आजवर फ्रेंच ओपनमध्ये फक्त दोन जणांनी पराभूत केले आहे आणि त्यातला एक जोकोविच आहे.
दोघे आमनेसामने असताना आकडेवारी अशी आहे
जोकोविच – नदाल
२९-२६
७-१७ क्ले कोर्ट
६-९ ग्रँडस्लॅम
१-४ फ्रेंच ओपन
१-० : २०२०
दोघांत झालेल्या गेल्या १८ पैकी १४ सामने जोकोविच जिंकला आहे.
दोघांच्या सेमी फायनल सामन्यांचा विचार केला तर राफा तीन सेट खेळला तर जोकोविच पाच. पण जोकरने पाच सेट खेळुनही तो राफापेक्षा फक्त ४५ मिनिटे जास्त खेळला आहे. जेव्हा आधीच्या सामन्यातील थकव्याची चर्चा होते तेव्हा ही आकडेवारी मदत करते.
गेली अनेक वर्षे मागे जाऊन पाहिलं टेनिस विश्वात फक्त आणि फक्त बिग थ्री चाच (नोवाक जोकोविच, राफेल नदाल, रॉजर फेडरर) दबदबा आहे. ही फायनलसुद्धा त्याला अपवाद नसेल.
गेल्या १६-१७ वर्षांत अनेकदा या तिघांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले, पण प्रत्येक वेळी हे तिघे तितक्याच उमेदीने उभे राहिले आणि विशेष म्हणजे जिंकलेसुद्धा. आजचा सामना टेनिस रसिकांसाठी मेजवानी असणार आहे.
किती वाजता सुरु होणार सामना- संध्याकाळी ६:२० ला (भारतीय प्रमाणवेळेनुसार)