पॅरिस | यूएस ओपन चॅम्पियन डोमिनिक थिमने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा पराभव केला तर महिला एकेरीत अव्वल मानांकित सिमोना हालेपनेही सरळ सेटमध्ये विजय मिळविला.
ऑस्ट्रियाच्या तिसऱ्या मानांकित थिमने कॅस्परला दोन तास आणि 15 मिनिटे चाललेल्या सामन्यात 6-2, 6-3, 6-1 ने पराभूत केले. फ्रेंच ओपन स्पर्धेच्या मागील दोन अंतिम सामन्यात थिमचा अनुभवी टेनिसपटू राफेल नदालने पराभव केला होता. कॅस्पर ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या चौथ्या फेरीसाठी पात्र होण्यासाठी प्रयत्न करीत होता. चौथ्या फेरीत पोहोचणारा तो नॉर्वेचा दुसरा खेळाडू ठरला असता. त्याचे वडील आणि प्रशिक्षक क्रिस्टियन रुड ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धेच्या चौथ्या फेरीत पात्र ठरलेले नॉर्वेचे पहिले खेळाडू होते.
क्रिस्टियन यांनी 1997 मध्ये ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये हा पराक्रम केला होता. 27 वर्षीय थिमने लवकरच पहिल्या सेटमध्ये आपली सर्व्हिस गमावली आणि कॅस्परला 3-1 अशी आघाडी मिळाली. थिमने मात्र त्यानंतर लवकरच कॅस्परची सर्विस खंडित केली. त्याने 15 पैकी 6 ब्रेक पॉईंट्सचा लाभ घेतला, तर 8 पैकी 7 ब्रेक पॉईंट्सचा बचाव केला.
रोमेनियाच्या हालेपने अमेरिकेच्या 25 व्या मानांकित अमांडा अनीसिमोव्हाचा सहज पराभव केला. गेल्या वर्षी फ्रेंच ओपनमध्ये अमांडाविरुद्ध पराभूत झालेल्या हालेपने चौथ्या फेरीत प्रवेश केला. तिने अवघ्या 54 मिनिटात 6-0, 6-1 ने हा सामना जिंकला.
हा हलेपचा सलग 17 वा विजय आहे. तिने आतापर्यंत दोन ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. रॉलँड गॅरो येथे 2018 चे विजेतेपद मिळवणार्या हालेपची पुढील लढत पोलंडच्या इनगा स्विएटेकशी होईल. स्विएटेकने कॅनेडियाचा युजेनी बाऊचार्डचा 6-3, 6-2 ने पराभव केला होता.
युक्रेनच्या तिसर्या मानांकित स्वितोलिनानेही रशियाच्या 27 व्या मानांकित एकटेरिका अलेक्झांड्रोचा 6-6, 7-5 ने पराभव करून चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. तर अर्जेटिनाच्या नादिया पोडोरोव्हस्काने स्लोव्हाकियाच्या कॅरोलिना शिमिदलोव्हाचा 6-3, 6-2 ने पराभव केला.