पॅरीस येथे सुरू असलेली रोलॅन्ड गॅरोस म्हणजेचं फ्रेंच ओपन स्पर्धा अंतिम टप्यात आली आहे. आज जागतीक महिला क्रमवारीत अव्वल असणारी रोमानियाची सिमोना हालेप आणि स्पेनची गर्बी मुगुरूझा यांच्यात महिला एकेरीचा उपांत्य फेरीचा सामना होत आहे.
काल झालेल्या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात तृतीय मानंकीत मुगुरूझाने 28 व्या मानंकीत मारिया शारापोव्हाचा 70 मिनिटे चाललेल्या सामन्यात 6-2, 6-1 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
मारिया शारापोव्हाचा ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धेत गेल्या सहा वर्षातील सर्वात वाईट पराभव आहे. चौथ्या फेरीच्य़ा सामन्यातून सरेना विलियम्सने माघार घेतल्यामुळे शारापोव्हाला उपांत्य पूर्व सामन्यात थेट प्रवेश मिळाला होता. मुगुरूझाने शारापोव्हा विरूध्द खेळलेल्या चार सामन्यात पहिल्यांदा विजय मिळवला आहे.
तर या उपांत्य सामन्यातील दुसरी खेळाडू सिमोना हालेपने उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या अंजेलिक कर्बरला 6-7, 6-3, 6-2 अशा फरकाने हरवले. हालेप फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत तीसऱ्यांदा पोहचली आहे.
2017 फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात जेलेना ऑपस्टापेनकोने हालेपचा पराभव केला होता.