---Advertisement---

आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात कमी वयात शतक करणारा फलंदाज मिळाला, १८व्या वर्षी विरोधी संघाला झोडपले

On: मंगळवार, जुलै 26, 2022 3:02 PM
France-Team
---Advertisement---

फ्रांसचा सलामीवीर फलंदाज गुस्ताव मॅकॉन आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात कमी वयात शतक ठोकणारा खेळाडू बनला आहे. त्याचे वय सध्या १८ वर्ष आणि २८० दिवस आहे आणि त्याने ही मोठी कामगिरी करून दाखवली आहे. स्विट्जरलंडविरुद्धच्या सामन्यात गुस्तावने हा पराक्रम केला आहे. आगामी काळात खेळल्या जाणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषकाचा हा क्वालिफायर सामना होता. 

गुस्ताव मॅकॉन (Gustav Mckeon) याने या सामन्यात ६१ चेंडू खेळले आणि यामध्ये १०९ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ५ चौकार आणि ९ षटकार निघाले. गुस्तावचा हा आंतरराष्ट्रीय टी-२० मधील दुसराच सामना होता. यापूर्वी त्याने चेक रिपब्लिकविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात ५४ चेंडूत ७६ धावांची खेळी केली होती.

या प्रदर्शानंतर गुस्तावने अफगाणिस्तानचा फलंदाज हजतुल्लाह जाजईचा २ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. अफगाणिस्तानच्या या सलामीवीर फलंदाजाने २०१९ मध्ये आयर्लंडविरुद्धच्या एका टी-२० सामन्यात अवघ्या ६२ चेंडूत १६२ धावा ठोकल्या होत्या. त्या सामन्यावेळी हजरतुल्लाहचे वय २० वर्ष आणि ३३७ दिवस होते. त्यावेळी टी-२० क्रिकेटमध्ये शतक करणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला होता. आता हा विक्रम गुस्तावने नावावर केला आहे.

दरम्यान, सामन्याचा विचार केला तर गुस्तावने जरी शतक ठोकले असले, तरी फ्रांस संघाला विजय मात्र मिळू शकला नाही. स्विट्जरलंडने हा सामना १ विकेटने जिंकला. फ्रांसने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ५ विकेट्सच्या नुकसानावर १५७ धावा केल्या. एकटा गुस्ताव सोडला, तर संघातील दुसरा एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला स्विट्जरलंडचा संघाला कर्णधार फहीम नजीरने चांगली सुरुवात दिली. त्याने ४६ चेंडूत ६७ धावांची खेळी केले. त्यानंतर शेवटच्या षटकात गोलंदाजीत चांगले प्रदर्शन करणाऱ्या नैय्यरने उत्कृष्ट फलंदाजी देखील केली. त्याने शेवटच्या ३ चेंडूवर १२ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.

टी-२० मध्ये शतक करणारे सर्वात कमी वजाचे खेळाडू 
गुस्ताव मॅकॉन – १८ वर्ष २८० दिवस, फ्रांस विरुद्ध स्विट्जरलंड (२०२२)
हजरतुल्लाह जाजई – २० वर्ष ३३७ दिवस, अफगाणिस्तावन विरुद्ध आयर्लंड (२०१९)
शिवाकुमार पेरियाल्वर – २१ वर्ष १६१ दिवस, रोमारिया विरुद्ध तुर्की, इलफोन काउंटी (२०१९)
ऑर्किड तुईसेंगे – २१ वर्ष १९० दिवस, रवांडा विरुद्ध सेशेल्स, किगाली (२०२१)
दीपेंद्र सिंह – २२ वर्ष ६८ दिवस, नेपाळ विरुद्ध मेलशिया, काठमांडू (२०२२)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

WI vs IND | निकोलस पूरनची जडेजालाही लाजवेल अशी फिल्डिंग, व्हिडिओ पाहून व्हाल चकित

फक्त तीन टी-२० सामन्यांमध्ये संधी दिल्यानंतर उमरान मलिकचा पत्ता कट, आता ‘असा’ आहे पुढचा प्लॅन

वेस्ट इंडिजला क्लिन स्वीप देण्यासाठी भारताची नवी ‘स्ट्रॅटर्जी!’ संघात ‘हे’ महत्वाचे बदल होणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---