दिल्ली | आयपीएल २०१८वर सट्टा लावत असलेल्या तिघांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना मुंबई विरूद्ध दिल्ली सामन्यात सट्टा लावताना पकडण्यात आले.
ते तिघे आॅनलाईन सट्टा लावताना त्यांना दिल्लीत पकडले आहे. हा सर्व प्रकार शनिवारी घडला.
त्यांच्याकडून लॅपटाॅप, ११ मोबाईल, टीव्ही आणि डीजिटल रिसीवर जप्त करण्यात आले आहेत.
“आपण हे पहिल्यांदाच करत असल्याचं त्या तिघांचं म्हणणं होतं परंतू आम्हाला माहित आहे की ते ७ एप्रिलपासून अायपीएलवर सट्टा लावत आहेत. “असे दिल्ली पोलिसमधिल वरिष्ठ अधिकारी युधविर सिंग म्हणाले.
काही वृत्तांनुसार यापुर्वी आयपीएल २०१८च्या पहिल्याच आठवड्यात पोलिसांनी बंगाल तसेच हैद्राबादमध्ये सट्टाबाजीची मोठी रॅकेट उद्ध्वस्त केली आहेत.