ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) याचे शुक्रवारी निधन झाले. त्याला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. ५२ वर्षीय वॉर्नचे जेव्हा निधन झाले, तेव्हा तो थायलंडमधील कोह समूहच्या एका प्रायवेट व्हिलामध्ये होता. तिथे त्याचे तीन मित्र देखील होते. या मित्रांनी त्याची प्राण वाचवण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र त्यांना अपयश आले आणि शेन वॉर्नने अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाचा सध्या थायलंड पोलिस तपास करत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वॉर्नच्या मित्रांनी २० मिनिट त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच पोलिंसांनी सांगितल्याप्रमाणे अजूनपर्यंत शेन वॉर्नच्या मृत्यूबाबत काही संशयित आढळलेले नाही.
बेशुद्ध अवस्थेत आढळलेला वॉर्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे वॉर्न त्याच्या मित्रांसह प्रायवेट व्हिलामध्ये राहत होता. यावेळी रात्री जेवणासाठी तो खाली न आल्याने त्याचा मित्र त्याला बोलवण्यासाठी गेला. तेव्हा त्याच्या मित्राला वॉर्न बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्यावेळी त्याच्या मित्रांनी त्याला २० मिनिटे सीपीआर दिला. तसेच मित्रांनी रुग्णवाहिकाही बोलावली होती. त्यामुळे त्याला तातडीने थाई इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. हॉस्पिलमध्येही त्याला जवळपास ५ मिनिटे सीपीआर देण्यात आला. पण वॉर्नचा जीव वाचवण्यात अपयश आले.
ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मारिस पेने यांनी वॉर्नच्या मित्रांशी संवाद साधला आहे. तसेच ते थायलंड सरकारशी संपर्क साधून वॉर्नचा मृतदेश ऑस्ट्रेलियात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
वॉर्नने मृत्यूच्या काही तासापूर्वीच इंस्टाग्रामवर प्रायवेट व्हिलामधील काही फोटोही शेअर केले होते. तसेच त्याने ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टीरक्षक फलंदाज रॉड मार्श यांना श्रद्धांजली वाहणारे ट्वीटही केले होते. मार्श यांचेही शुक्रवारीच सकाळी निधन झाले. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
मोहाली कसोटी : रविंद्र जडेजाचे शानदार शतक, रचले विक्रमांचे मनोरे; हटके सेलिब्रेशन चर्चेत
PAK vs AUS: पहिल्या कसोटीच्या खेळपट्टीचा फोटो पाहून युझर्सनी केली थेट रस्त्याशी तुलना, पाहा मीम्स