नुकताच आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव (IPL 2022 Mega auction) पार पडला. या लिलावात ईशान किशन (ishan kishan) श्रेयस अय्यरसारख्या खेळाडूंवर मोठी बोली लागली. ११ खेळाडूंवर १० कोटीहून अधिक बोली लागली. तसेच काही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करुनही ते कमी किमतीत विकले गेले. या लेखात आपण अशा ४ खेळाडूंबद्दल जाणुन घेवूयात जे या आयपीएलमध्ये गेम चेंजर्स ठरू शकतात.
१. ऍलेक्स हेल्स (१.५ कोटी)
या खेळाडूला पहिल्या फेरीत कोणत्याच फ्रॅंचायझीने विकत घेतले नाही. शेवटी दुसऱ्या दिवशी या खेळाडूवर कोलकत्ता नाईट रायडर्सने १.५ कोटींची बोली लावली. ऍलेक्सला टी२० क्रिकेटचा खुप अनुभव आहे आणि तो जगातील अनेक टी२० लीगमध्ये भान घेत असतो. या हंगामात केकेआर सलामीसाठी ऍलेक्स हेल्स आणि व्यंकटेश अय्यरवर अवलंबून राहू शकतो.
२.डॅरिल मिशेल (७५ लाख)
डॅरिल मिशेल या फलंदाजाने गेल्या काही काळात चांगली फलंदाजी केली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे नाव कमवले आहे. परंतु त्याला अद्यापही आयपीएलमध्ये स्थान मिळवता आलेले नाही. त्याला या लिलावात राजस्थान राॅयल्स संघाने विकत घेतले आहे. त्याला संघाने त्याच्या मुळ किमतीत म्हणजेच ७५ लाखांना विकत घेतले आहे.
३. डेव्हाॅन काॅनवे (१ कोटी)
या खेळाडूने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात चांगली केली आहे. लाॅर्ड्सवर कसोटी पदार्पणात द्विशतक झळकावले आहे. त्याने खुप कमी काळात न्युझीलंड संघात स्थान मिळवले आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने त्याला १ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहे. गरज वाटल्यास हा खेळाडू संघासाठी यष्टीरक्षकाची भुमिका बजावू शकतो.
४. डेव्हिड वाॅर्नर (६.२५ कोटी)
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वाॅर्नरला दिल्ली कॅपीटल्स संघाने ६.२५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. यापुर्वी तो सनरायझर्स हैदरबादचा कर्णधार होता. २०२१ सोडून प्रत्येकवर्षी त्याने संघासाठी ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. संघाने त्याला रिटेन केले नाही. तीनवेळा ऑरेंज कॅप पटकवणाऱ्या या खेळाडूने हेद्राबाद संघाला चॅम्पियनदेखील बनवले आहे.
५. आर. व्हॅन डर ड्युसेन (१ कोटी)
दक्षिण आफ्रिकेचा मधल्या फळीतील फलंदाज ड्युसेन या आयपीएल हंगामात राजस्थान राॅयल्स संघात खेळताना दिसणार आहे. संघाने त्याला १ कोटी रुपयांत विकत घेतले आहे. या ३३ वर्षीय खेळाडूच्या नावे टी२० क्रिकेटमध्ये मोठा विक्रम आहे. त्याने आत्तापर्यंत ३४ सामन्यांत ३८.८७ च्या सरासरीने ९३३ धावा केल्या आहेत.
या आयपीएल लिलावात भारताचा माजी खेळाडू सुरेश रैना तसेच स्टीव्ह स्मिथ मोठ्या खेळाडूंवर कोणत्याच फ्रॅंचायझीनी बोली लावल्या नाहीत. तर, ईशान किशनला मुंबई इंडीयन्सने सर्वाधिक बोली लावत १५.२५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. ईशान या आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘वर्ल्डकप हिरो’ राज बावाची रणजी पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर कमाल (mahasports.in)
Video: विराट जरा जपून…! पहिल्या टी२०त माजी कर्णधाराची घसरली जीभ, वापरले अभद्र शब्द (mahasports.in)
नवी आयसीसी क्रमवारी| विराट-बाबरसह हेजलवूडही ‘त्या’ खास यादीत सामील (mahasports.in)