अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू होत्या. अखेर हे जोडपे 12 जुलैला मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये लग्नबंधनात अडकले. या लग्नसोहळ्याला रजनीकांत आणि अनिल कपूर आणि बोरिस जॉन्सन यांच्यासह जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली होती. याशिवाय अनंत अंबानींच्या लग्नाला देश-विदेशातील क्रीडा क्षेत्राशी निगडित प्रसिद्ध लोकही आले होते.
हार्दिक, कृणाल आणि ईशान एकत्र आले
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नातही पांड्या बंधूंनी धुमाकूळ घातला आहे. हार्दिक पांड्यासोबत कृणाल पांड्या आणि त्याची पत्नी पंखुरी शर्माही आले होते. पंड्या बंधूंसोबत आणखी एक भारतीय क्रिकेटर इशान किशननेही जबरदस्त एंट्री केली. इशान किशनने सूट घातला आहे, तर कृणाल पांड्यानेही पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. हार्दिकचा ड्रेस पुन्हा चर्चेत आला आहे कारण त्याने पांढरा पारदर्शक कुर्ता घातला आहे.
एमएस धोनी कुटुंबासह पोहोचला
टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आपल्या कुटुंबासह अनंत-राधिकाच्या लग्नाला हजेरी लावली होती. धोनीने सोनेरी रंगाचा पठाणी सूट घातला आहे, तर त्याची पत्नी साक्षीने हिरव्या रंगाचा लेहेंगा घातला आहे. त्यांची मुलगी जीवा देखील पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत आहे.
गाैतम गंभीर-नताशा जैन
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गाैतम गंभीर आपल्या पत्नी नताशासह अनंत-राधिकाच्या लग्नाला पोहचला. यावेळी गंभीरने काळ्या रंगाचा कोट घातला होता. यावेळी गाैतम आणि नाताशाची जोडी शानादार लूक मध्ये दिसत होती. तर गंभीर हेड कोच म्हणून 26 जुलै पासून भारतीय संघाची धुरा सांभाळणार आहे.
जसप्रीत बुमराह-संजना
भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पत्नी संजाना देखील अनंत-राधिका यांच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी बुमराहने जांभळ्या रंगाची शेरवानी परिधान केला होता.
टिळक वर्मा आणि क्रिस श्रीकांत
टिळक वर्मा यांचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये ते पांढऱ्या रंगाची शेरवानी घातलेले दिसत आहेत. टिळक वर्मा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतात. त्याच्याशिवाय 1983 क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग असलेला ख्रिस श्रीकांत देखील सोनेरी रंगाची शेरवानी परिधान करून लग्न समारंभात पोहोचला होता. त्याची पत्नी विद्याही साडीत खूपच सुंदर दिसत आहे.
महत्तवाच्या बातम्या-
जेव्हा जेम्स अँडरसननं बॉक्सिंगमध्ये हात आजमावला! ॲशेस मालिकेपूर्वी झाला होता घोळ
अंबानींच्या लग्नात धोनीचा स्टाईलिश लूक, कुटुंबासोबतचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
“तुझी 22 वर्षांची कारकीर्द…”, जेम्स अँडरसनसाठी सचिन तेंडुलकरची खास पोस्ट