मुंबई इंडियन्ससाठी आकाश मधवाल बुधवारी हुकमी एक्का ठरला. जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर हे प्रमुख गोलंदाज संघातून बाहेर असताना आकाशच्या रुपात मुंबईला नवा मॅच विनर ठेळाडू मिळाला. लकनऊ सुपर जांयंट्स विरुद्ध एलिमिनेटर सामन्यात मुंबईने 81 धावांनी विजय मिळवला आणि क्वॉलिफायर सामन्यात संधी मिळाली. इंजीनियरचे शिक्षण घेतलेल्या आकाशसाठी आयपीएलमध्ये यश मिळवण्यापर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता.
लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध आकाश मधवाल (Akash Madhwal) याने 3.3 षटकांमध्ये अवघ्या 5 धावा खर्च करून पाच विकेट्स नावावर केल्या. आपल्या पहिल्याच आयपीएल हंगामात आकाशने सलग दोन सामन्यांमध्ये मुंबईला विजय मिळवून दिला. याआधी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या आकाशने चार विकेट्स घेतल्या होत्या. कारकिर्दीतीच पहिल्याच आयपीएल हंगामात आकाशने सर्वांना आपल्या गोलंदाजीचे वेड लावले आहे. त्याने आपले शिक्षण इंजीनियरिंगमध्ये पूर्ण केले आहे. उत्तराखंडच्या रुडकीमधून त्याने बीटेक केले आहे.
लखनऊविरुद्धच्या जबरदस्त प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला. यावेळी समालोचक हर्षा भोगले यांनी त्याच्याशी चर्चा केली. आकाश म्हटल्याप्रमाणे त्याला या सामन्यानंतर स्वतःचा अभिमान वाटत आहे. आकाश म्हणाला, “मी खूप सराव करत होतो आणि संधीसाठी वाट पाहत होतो. मी इंजीनियर आहे आणि क्रिकेट खेळण्याची आवड आहे. 2018 पासून मी या संधीची वाट पाहत होतो.” यावेळी हर्षा भोगले असेही म्हणाले की, “आकाश मधवाल नवीन गोष्टी खूपच लवकर शिकतो, असं ऐकलं आहे. यामागे काही खास कारण किंवा शैली आहे?” भोगलेंच्या या प्रश्नाचे उत्तर आकाशने मजेशीर पद्धतीने दिले. तो म्हणाला, “गोष्टी लवकर शिकणे ही कोणत्याही इंजीनियरची सवय असते.”
दरम्यान, आकाशने आपल्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 7 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 13 विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 7.77च्या इकॉनॉमिने धावा खर्च केल्या आहेत आणि सरासरी 12.85 राहिली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने 10 प्रथम श्रेणी, 17 लिस्ट ए आणि 29 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे 12, 18 आणि 37 विकेट्स घेतल्या आहेत. (From engineer to cricketer… this is the cricketing journey of Akash Madhwal, the savior of Mumbai)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मधवालचे आकाशासारखे मन! म्हणाला, “माझी बुमराहसोबत तुलना नको, त्याचा दर्जा वेगळा”
“मुंबईविरूद्ध फायनल नको रे बाबा”, सीएसकेच्या प्रशिक्षकांनी आत्ताच घेतली धास्ती