टी२० विश्वचषक २०२१ ची सुरुवात होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. रविवार रोजी (१७ ऑक्टोबर) पापुआ न्यू गिनी विरुद्ध ओमान यांच्यातील लढतीने या स्पर्धेचा शुभारंभ होईल. संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये हे टी२० विश्वचषकाचे सामने खेळवले जातील. यंदा बरेचसे संघ चांगल्या लयीत असल्याने चषक पटकावण्यासाठी चुरशीची स्पर्धा पाहायला मिळू शकते. तत्पूर्वी आम्ही या स्पर्धेतील आतापर्यंतच्या सर्व विजेत्या संघांविषयीची माहिती सांगणार आहोत.
२००७ मध्ये टी२० विश्वचषक स्पर्धेची सुरुवात झाली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत ५ वेळा ही स्पर्धा खेळवण्यात आली आहे. २००७ मध्ये पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत टी२० विश्वचषकाचे सामने खेळवले गेले होते. त्यानंतर २००९ मध्ये इंग्लंड, २०१० मध्ये वेस्ट इंडिज, २०१२ मध्ये श्रीलंका, २०१४ मध्ये बांगलादेश आणि २०१६ मध्ये भारतात टी२० विश्वचषक आयोजण्यात आला होता. या ६ वर्षांमध्ये टी२० विश्वचषकाला ५ वेगवेगळे विजेते लाभले आहेत.
टी२० विश्वचषक २००९- पहिल्या टी२० विश्वचषकात उपविजेता राहिलेल्या पाकिस्तान संघाने दुसऱ्या हंगामात चषकावर आपले नाव कोरले होते. त्यांनी २००९ मध्ये झालेल्या टी२० विश्वचषकात ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर श्रीलंकेला ८ विकेट्सने चितपट केले होते. यावेळी पाकिस्तान संघाचे नेतृत्त्वपद यूनुस खान याच्या हाती होते.
टी२० विश्वचषक २०१०- वर्ष २०१० मध्ये टी२० विश्वचषकाचे आयोजन वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आले होते. या विश्वचषकात इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम लढत रंगली होती. पॉल कॉलिंगवुडच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंडने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला ७ विकेट्सने धूळ चारत विश्वचषक जिंकला होता. हा इंग्लंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणत्याही स्वरुपातील पहिलाच आयसीसीचा खिताब होता.
टी२० विश्वचषक २०१४- वर्ष २०१४ मध्ये टी२० विश्वचषकाचे आयोजन बांगलादेश येथे करण्यात आले होते. मीरपूरच्या शेर ए बांगलादेश स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात या विश्वचषकाचा अंतिम सामना रंगला होता. कुमार संगकाराच्या नेतृत्त्वाखालील श्रीलंका संघाने ६ विकेट्स राखून भारतावर सोपा विजय मिळवला होता आणि टी२० विश्वचषक आपल्या नावावर केला होता.
टी२० विश्वचषक २०१६- टी२० विश्वचषक २०१६ चे आयोजन भारतातच करण्यात आले होते. कोलकाता येथे वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यात या विश्वचषकाचा अंतिम सामना रंगला होता. वेस्ट इंडिजने ४ विकेट्सने इंग्लंडला पराभूत करत दुसऱ्यांदा टी२० विश्वचषक जिंकला होता. यासह वेस्ट इंडिज संघ टी२० विश्वचषकाच्या इतिहासात २ वेळा विजेता ठरणारा पहिलाच संघ आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Photo: नाही चालली कोणतीही हुशारी, टी२० विश्वचषकाच्या नव्या जर्सीवर पाकिस्तानने लिहिले भारताचे नाव
पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी भारत ‘या’ दोन बलाढ्य संघांशी करणार दोन हात, पाहा संपूर्ण वेळापत्रक