---Advertisement---

भन्नाट शक्कल लढवतोय ‘हा’ क्रिकेटर, चक्क गोलंदाजांसाठी बनवतोय हेल्मेट

On: मंगळवार, डिसेंबर 22, 2020 12:12 PM
---Advertisement---

टी२० क्रिकेटच्या आगमनाने फलंदाज आक्रमक फटके मारताना दिसत आहेत. सुरुवातीच्या काळात षटकार व चौकार हे फार कमी प्रमाणात खेळतांना दिसत. मात्र, आता टी२० क्रिकेटमध्ये जणूकाही चौकार व षटकारांची आतिषबाजीच बघायला मिळते. याचदरम्यान अनेक वेळा गोलंदाजांना दुखापतीही होताना दिसते. फलंदाज आक्रमक फटके मारत असताना अनेक वेळा गोलंदाजांच्या चेंडू डोक्यावर आदळल्याचे दिसत आहे. यावर उपाय म्हणून इंग्लंडमधील काउंटी स्पर्धेतील यॉर्कशायर संघाचा गोलंदाज बेन कोड हा गोलंदाज वापरू शकतील अशा प्रकारच्या हेल्मेटचे डिझाईन तयार करत आहे.

नुकत्याच भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ दरम्यान झालेल्या सराव सामन्यात जसप्रीत बुमराहने मारलेला चेंडू थेट गोलंदाज कॅमरॉन ग्रीनच्या डोक्यावर जाऊन आदळला होता. त्यानंतर ग्रीनला कन्कशनमुळे मैदानाबाहेर जावे लागले होते.

गोलंदाज आता नेटमध्ये गोलंदाजी करताना घाबरतात
पत्रकारांशी बोलताना कोड म्हणाला, “मी दुखापतग्रस्त होण्याऐवजी हेल्मेट वापरणे पसंत करेल. यापूर्वी अनेक गोलंदाज हॉकीचे हेल्मेट घालून गोलंदाजी करत असत. पण ते पूर्णत: सुरक्षित नाही.” कोड याने असेही सांगितले की, “सध्याच्या काळात गोलंदाज नेट्समध्ये गोलंदाजी करताना घाबरतात. त्यांना दुखापतीची भीती असते.”

इयान चॅपल यांच्या मते मैदानावरील सुरक्षिततेबाबत समीक्षा होणे गरजेचे
ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज खेळाडू इयान चॅपल यांनीही मैदानावरील सुरक्षिततेबाबत नियम बनवणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. त्यांच्यामते गोलंदाज व फलंदाजांसोबतच पंचांचीही सुरक्षितता गरजेची आहे.

दुखापतीमुळे फ्लेचर चालवू शकला नव्हता ६ महिने गाडी, लिहिले होते पुस्तक

सन २०१७ मध्ये इंग्लिश काऊंटी क्रिकेटमधील एका सामन्यात वॉर्कशायरविरुद्ध नॉटिंगहॅमचा गोलंदाज ल्यूक फ्लेचरच्या डोक्यावर सॅम हेनचा चेंडू लागला होता. त्यामुळे तो तब्बल ६ महिन्यांपर्यंत गाडी चालवू शकला नव्हता. त्याने यावर एक पुस्तकही लिहिले आहे.

न्यूझीलंडच्या देशांतर्गत स्पर्धेतही अनेक गोलंदाज हेल्मेटचा वापर करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

द्रविड भारतीय फलंदाजांच्या मदतीसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार? राजीव शुक्लांनी दिले ‘हे’ उत्तर

भाई साहब इतनी अंग्रेजी! कैफच्या ‘त्या’ ट्विटवर हरभजनची मजेदार कमेंट

‘द वॉल’च्या तालमीत क्रिकेटचे धडे गिरवणारा ‘हा’ पठ्ठ्या असेल भारताची ‘सलामी’ तोफ; लवकरच होणार पदार्पण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---