‘कोची एक्सप्रेस’ नावाने प्रसिद्ध असलेला श्रीसंत याने बुधवारी (९ मार्च) क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. एकवेळ भारतीय संघातला महत्त्वपूर्ण गोलंदाज राहिलेला हा खेळाडू वेगवान गोलंदाज कसा बनला याची माहिती त्याने काही महिन्यांपूर्वी दिली होती.
श्रीसंत लहानपणापासून माजी दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे यांचा जबरदस्त मोठा चाहता आहे. लहानपणी तो त्यांच्या गोलंदाजीची नक्कल करायचा. श्रीसंतला बालपणी फिरकी गोलंदाज व्हायचे होते.
श्रीसंतने आपल्या क्रिकेटची सुरुवात सलामीचा फलंदाज म्हणून केली होती. तो वनइंडिया हिंदीशी बोलताना म्हणाला होता, “दहावीपर्यंत सलामीला आणि त्याच्यानंतर 17 आणि 19 वर्षांखालील संघात मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायचो. त्यावेळी मी पार्ट टाइम फिरकी गोलंदाजीही करायचो.”
तो म्हणाला, “जेव्हा सामना बंगळूर येथे व्हायचा तेव्हा मी शेन वॉर्नच्या शैलीत फिरकी गोलंदाजी करायचो. यासोबत वॉर्न आणि कुंबळे यांची एक दोघांची शैलीचे मिश्रण करून लेगस्पिन गोलंदाजी करायचो.”
“अकरावीच्या वर्गात असताना मी कोची येथे आलो तेव्हा टेनिस बॉल टुर्नामेंटमध्ये खेळत होतो. टेनिस बॉलमध्ये वेगाने गोलंदाजी करायची असते. मला खूप चांगले वाटायचे. तेव्हा सामने रात्री 7 ते सकाळी 7 पर्यंत चालू रहायचे. तो माझ्यासाठी खूप चांगला अनुभव होता आणि तिथूनच वेगवान गोलंदाजी करण्यास सुरुवात झाली,” असेही श्रीसंत नमूद केले होते.
“माझा भाऊ पण वेगवान गोलंदाज होता. मी त्याच्यापेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करायचो. त्याच वेळी टिनू योहानन यांनी भारताकडून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर मी ठरवले आपण वेगवान गोलंदाज व्हायचे. पुढे डेनिस लिली यांचे मार्गदर्शन मिळाले. अशाप्रकारे माझ्यातल्या प्रतिभेला वाव मिळाला,” असे श्रीसंतने सांगितले
श्रीसंतची कारकिर्द –
श्रीसंतने भारताकडून खेळताना 27 कसोटीत 87 विकेट्स तर 53 वनडे सामन्यात 75 विकेट्स त्याने घेतल्या आहेत. तसेच तो 2007 च्या टी20 विश्वचषक आणि 2011 च्या वनडे विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचाही भाग होता.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: एकदम भन्नाट! पुजा वस्त्राकरच्या जबरदस्त डायरेक्ट थ्रोवर न्यूझीलंडची सुझी बेट्स रनआऊट
बंगळुरू कसोटी टीम इंडियासाठी महत्त्वाची, टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत होऊ शकतो मोठा फेरबदल
‘जॉनी बेयरस्टो आयपीएल खेळतो का?’, इरफान पठाणने असा प्रश्न का विचारला