---Advertisement---

लखनऊ फ्रँचायझीचे मालक संजीव गोयंका ग्रूपचे सुपरजायंट्ससोबत आहे जुने नाते, ५ वर्षांपूर्वी संघ खेळलेला फायनल

Sanjiv Goanka
---Advertisement---

आयपीएलच्या पुढच्या मोसमात ८ नाही, तर १० संघांचा सामावेश असणार आहे. नवीन संघांतील एका संघाचे नामकरण करण्यात आले आहे. लखनऊ सुपरजायंट्स हे २०२२ मध्ये खेळणाऱ्या नव्या संघाचे नाव असणार आहे. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये आरपी संजीव गोयंका ग्रुपने लखनऊ फ्रॅंचायझी ७०९० कोटी रुपयांना विकत घेतली होती. यानंतर संघाच्या नावाबाबत चाहत्यांकडून मागणी केली जात होती आणि आता संघाचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

सुपर जायंट्ससोबत लखनऊ फ्रॅंचायझीला विकत घेतलेल्या संजीव गोयंका ग्रूपचे खूप जूने संबंध आहेत. या कंपनीने आयपीएल संघ विकत घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. या अगोदर २०१६ आणि २०१७ मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान राॅयल्स संघांना स्पाॅट फिक्सिंग आणि बेटिंगमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांमुळे तात्पुरते निलंबीत केले होते. तेव्हा या दोन संघांऐवजी दोन नवीन फ्रॅंचायझींनी लीगमध्ये भाग घेतला. एकाचे नाव होते गुजरात लायन्स आणि दुसऱ्या संघाचे नाव पुणे सुपरजायंट्स होते.

साल २०१६ मध्ये आरपी संजीव गोयंका ग्रुपने रायझिंग पुणे सुपरजायंट्स हा संघ विकत घेतला होता. पुणे वाॅरियर्सनंतर पुणे शहराचे नाव घेणारा हा दुसरा संघ होता. रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा कर्णधार २०१६ हंगामासाठी महेंद्रसिंग धोनीला बनवण्यात आले. तसेच संघात केविन पीटरसन, स्टीव्ह स्मिथ, फाफ डूप्लेसिससारख्या दिग्गज खेळाडूंना संघात सामील केले होते.

संघाने मोसमाची सुरुवात धमाकेदार केली आणि पहिल्याच सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडीयन्सचा ९ गडी राखून पराभव केला होता. मात्र, यानंतर सलग ४ सामने पराभूत झाली. यामधून संघ सावरु शकला नाही आणि १४ पैकी केवळ ५ सामने जिंकू शकला. २०१६ मध्ये गुणतालिकेत ७ वे स्थान पटकवले.

अधिक वाचा – आपण फेकलेल्या गुगलीतच फसली राजस्थान रॉयल्सची टीम, नव्या लखनऊ संघाने अशी जिरवली मस्ती

२०१७ मध्ये पुणे सुपरजायंट्स आयपीएल अंतिम सामना खेळली
साल २०१७ मध्ये दोन मोठे बदल करण्यात आले. संघाचे नवे नाव ठेवले गेले आणि कर्णधारसुद्धा बदलण्यात आला. महेंद्रसिंग धोनीऐवजी स्टीव्ह स्मिथला कर्णधार बनवण्यात आले. रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघ हा रायझिंग पुणे सुपरजायंट झाला. या दोन मोठ्या बदलांमुळे संघाचे नशिबच बदलून गेले. कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली संघ अंतिम फेरीत पोहचला. पण या संघाला पहिले विजेतेपद पटकवता आले नाही. अंतिम सामन्यात मुंबई इंडीयन्सकडून फक्त एक धावेने पराभव झाला.

व्हि़डिओ पाहा- नेमका जॉन राईट आणि सेहवाग मध्ये वाद तरी काय होता?

या सामन्यात पुणे सुपरजायंट संघाला २० षटकांत १३० धावांचे लक्ष्य गाठायचे होते. पण संघाने २० षटकांत ६ गडी गमावत १२८ धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने सर्वात जास्त ५१ धावांची शानदार खेळी केली होती. परंतु, तो संघाला विजेतेपद मिळवून देऊ शकला नाही. या मोसमात संघाने १४ पैकी ९ सामने जिंकले. पुढच्या वर्षी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सच्या पुनरागमनामुळे या दोन्ही संघांचे अस्तित्व संपुष्टात आले.

पुन्हा एकदा आरपी संजीव गोयंका ग्रुपने लखनऊ संघाला विकत घेतले आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा संघ लखनऊ आहे. लखनऊ फ्रँचायझीनी आपल्या संघातील ३ खेळाडूंची निवडसुद्धा केली आहे. केएल राहुल, मार्कस स्टॉयनिस आणि रवी बिश्नोई यांचा संघात समावेश करण्यात येणार आहे.

केएल राहुलला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. या संघाचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर असणार आहेत. केकेआरला दोनवेळा आयपीएल चॅम्पियन बनवणारा माजी कर्णधार गौतम गंभीर या संघाचा मार्गदर्शक असणार आहे. आता संघ मालकाचे सुपर जायंट्ससोबत असलेले जुने नाते संघासाठी किती भाग्यवान ठरते हे पाहावे लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“तुम्ही संघ आणि देशाला…” विराट-बीसीसीआय वादावर अखेर बोलले कपिल देव

Video: धोनीची ‘ही’ जाहिरात एखाद्या चित्रपटाच्या हिट सीनपेक्षा कमी नव्हे, पूर्ण होण्यास लागलंय एक वर्ष

प्रजासत्ताक दिनी ‘गोल्डन बॉय’ नीरजला दिले जाणार परम विशिष्ट सेवा मेडल, वाचा त्या पदकाबद्दल

नेमका जॉन राईट आणि सेहवाग मध्ये वाद तरी काय होता? । Sehwag and John Wright Controversy

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---