आपण फेकलेल्या गुगलीतच फसली राजस्थान रॉयल्सची टीम, नव्या लखनऊ संघाने अशी जिरवली मस्ती

आपण फेकलेल्या गुगलीतच फसली राजस्थान रॉयल्सची टीम, नव्या लखनऊ संघाने अशी जिरवली मस्ती

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि इतर क्रिकेटशी संबंधित व्यक्ती सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसतात. बऱ्याचदा सोशल मीडियावरच क्रिकेटपटूंमध्ये शाब्दिक वादावादीही झाल्याची उदाहरणे आहेत. इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) मधील राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) फ्रँचायझीही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या मजेशीर पोस्ट्ससाठी प्रसिद्ध असलेल्या राजस्थान संघाने नुकतीच नव्या लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु लखनऊ संघाने उलट राजस्थानचीच फिरकी घेतली (Banter On Twitter) आहे. 

त्याचे झाले असे की, पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या लखनऊ संघाने सोमवारी (२४ जानेवारी) आपल्या नावाची अधिकृत घोषणा केली. त्यांनी आपले नाव लखनऊ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. मात्र त्यांच्या संघाचे जुनी आयपीएल फ्रँचायजी पुणे सुपर जायंट्सच्या नावाशी मिळतेजुळते आहे. याच मुद्द्यावरून राजस्थान संघाने त्यांची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला.

व्हिडिओ पाहा- आज फारसे कुणाच्या लक्षात नसलेले टीम इंडियाचे एकेकाळचे पाच T20 Opener

राजस्थानने मजेशीर मीम ट्वीट करत लखनऊ संघावर निशाणा साधला होता. त्यांनी सुपरहिट कॉमेडी चित्रपट अंदाज अपना अपनामधील परेश रावलच्या एका सीनचा फेमस डायलॉग, मार्क इधर है. यावर मीम बनवून ते पोस्ट केले होते. यावर कॅप्शन देताना त्यांनी पुणे असे लिहिले होते. अशाप्रकारे अप्रत्यक्षात त्यांनी लखनऊ संघाचे नाव जुन्या पुणे संघाच्या नावावरून घेतले असल्याचा टोमणा मारला होता.

पण लखनऊ संघही शांत बसणाऱ्यातला नव्हता. राजस्थानने त्यांच्यावर गुगली फेकली. तर लखनऊने त्यांना दूसरा फेकत त्यांची मजा घेतली. लखनऊने राजस्थानच्या ट्वीटवर उत्तर देत लिहिले की, पूर्ण सन्मानाने म्हणतो की, आम्ही ती २ वर्षे तुम्हाला खूप मिस केले. अर्थात अप्रत्यक्षपणे लखनऊ संघाने राजस्थानला त्यांच्या २ वर्षांच्या निलंबनाची आठवण करून दिली आहे.

ट्वीटरवर या दोन्ही संघांनी एकमेकांची मजा घेताना केलेले ट्वीट ट्वीटर वापरकर्त्यांसाठी मात्र मनोरंजनाचा विषय बनले आहेत. अनेकांनी या दोन्ही संघांचे ट्वीट रिट्वीट केले आहेत.

राजस्थानव्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्ज आणि इतर आयपीएल फ्रँचायझींनीही लखनऊ संघाच्या नावावरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हे तीन खेळाडू केले ड्राफ्ट
प्रसिद्ध भारतीय उद्योगपती संजीव गोयंका यांच्या मालकीच्या लखनऊ संघाने भारतीय कर्णधार केएल राहुल, ऑस्ट्रेलियाचा प्रमुख अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस व युवा भारतीय लेगस्पिनर रवी बिश्नोई यांना ड्राफ्ट खेळाडूंचा रूपात निवडले आहे. त्यांना अनुक्रमे १५ कोटी, ११ कोटी व ४ कोटी अशी रक्कम करारबद्ध करण्यासाठी देण्यात आली. राहुल या संघाचा कर्णधार असेल.

असा आहे संघाचा सपोर्ट स्टाफ
भारताचा माजी सलामीवीर व कोलकता नाईट रायडर्सला दोन वेळा आयपीएल विजेते बनवणारा गौतम गंभीर संघाचा मेंटर असेल. तर, संघाचे मुख्य प्रशिक्षक ऍण्डी फ्लॉवर असतील. तर, सहाय्यक प्रशिक्षक म्हणून भारताचे माजी यष्टीरक्षक विजय दहिया यांची वर्णी लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

नामकरण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लखनऊ संघाला मोठा धक्का! संघातील प्रमुख सदस्याला कोरोनाची लागण

शेवटच्या षटकात ३ षटकार अन् २ चौकारांनंतरही वेस्ट इंडिजचा १ धावेने पराभव, वाचा रोमांचक सामन्याबद्दल सविस्तर

‘या’ पंचांच्या डोक्यावर सजला ‘आयसीसी अंपायर ऑफ द इयर’चा ताज; भारत-द. आफ्रिका वनडे ठरलेला शतकी सामना

हेही पाहा-

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.