विराट कोहली आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) (Virat Kohli And BCCI Controversy) यांच्यात मागील जवळपास तीन महिन्यांपासून चांगलाच वाद सुरू आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पटलावर भारताचे नाचक्की होतेय. या नाहकपणे सुरू असलेल्या वादावर माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही पक्षांना तोडगा देखील सुचविला आहे.
काय सुचवला कपिल देव यांनी पर्याय?
बीसीसीआय व विराट कोहली वादावर कपिल देव यांनी एका मुलाखतीत बोलताना म्हटले,
“अशा वादाचे आता आश्चर्य वाटत नाही. विराटने टी२० संघाचे नेतृत्व सोडले तेव्हा त्याच्या मनात काय सुरू असेल याची कल्पना कोणालाही नाही. तो एक महान खेळाडू आहे व आपण त्याच्या निर्णयाचा आदर करायला हवा.”
ते पुढे बोलताना म्हणाले,
“हा वाद लवकरात लवकर मिटला पाहिजे. तुम्ही संघाला व देशाला समोर ठेवायला हवे. तुम्ही एकमेकांना फोन करा आणि लवकरात लवकर हे प्रकरण निकाली काढा. काही महत्त्वकांक्षी कारणांनी हे नेतृत्व सोडले गेले असेल तर, ही गोष्ट अनाकलनीय आहे. मला विराटचा खेळ पाहायला आवडतो. त्याने आता फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त धावा काढाव्यात अशी माझी अपेक्षा आहे.”
काय आहे वाद
टी२० विश्वचषकापूर्वी विराट कोहली याने टी२० संघाचे नेतृत्व सोडले होते. त्यानंतर, सौरव गांगुली यांनी आपण त्याला नेतृत्व न सोडण्याविषयी विनंती केल्याचे सांगितले. मात्र, विराटने दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत आपल्याला कर्णधारपद सोडण्यापासून कोणीही रोखले नसल्याचे म्हटलेले. त्याचवेळी, वनडे विराटला संघाच्या कर्णधारपदावरूनही हटविले गेले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागल्यानंतर विराटने स्वतःहून कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
आपण फेकलेल्या गुगलीतच फसली राजस्थान रॉयल्सची टीम, नव्या लखनऊ संघाने अशी जिरवली मस्ती (mahasports.in)






