---Advertisement---

पुढील तीन महिने चाहत्यांसाठी पर्वणी! युएईत भरणार क्रिकेट कार्निवल

---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नवा हंगाम नुकताच सुरू झाला आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेने या भरगच्च कार्यक्रम असलेल्या हंगामाची सुरुवात झाली. त्याचवेळी, जगभरातील इतर ठिकाणीही द्विपक्षीय मालिका खेळल्या जात आहेत. असे असले तरी, पुढील तीन महिने क्रिकेट रसिकांसाठी चांगलीच मेजवानी असणार आहे. एकापाठोपाठ एक मोठ्या स्पर्धा खेळल्या जाणार असल्याने ही पर्वणी प्रेक्षकांना मिळेल. या सर्व घडामोडींचा केंद्रबिंदू संयुक्त अरब अमिराती (युएई) असेल.

हायप्रोफाईल इंग्लंड विरुद्ध भारत मालिका
सध्या भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. ही हाय प्रोफाईल मालिका १४ ऑगस्ट रोजी संपन्न होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दोन्ही मोठे संघ असल्याने सर्व क्रिकेट चाहत्यांची नजर या मालिकेवर आहे. मालिकेत भारतीय संघाने आघाडी घेतल्यामुळे मालिकेची उत्सुकता शिगेला पोहोचलीये.

आयपीएलची मेजवानी पुन्हा प्रेक्षकांपुढे
या मालिकेनंतर कोरोना महामारीमूळे मे महिन्यात स्थगित केला गेलेला इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) उर्वरित हंगाम युएई येथे सुरू होईल. १९ सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये क्रिकेट विश्वातील अनेक मोठे क्रिकेटपटू खेळत असतात. आयपीएलचा अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी खेळविण्यात येईल.

दोन दिवसात वाजणार विश्वचषकाचे बिगुल
आयपीएल संपल्याबरोबर दोन दिवसातच म्हणजे १७ ऑक्टोबरपासून युएई येथेच गेली दोन वर्ष रखडलेला टी२० विश्वचषक सुरू होणार आहे. स्पर्धेची सुरुवात ओमान येथे पात्रता फेरीच्या सामान्यांनी होईल. त्यानंतर, सुपर १२ व बाद फेरीचे सामने खेळले जातील. विश्वचषकाचा अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे.
अशाप्रकारे पुढील तीन महिने क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असणार आहे. त्यातही भारतीय संघातील खेळाडूंसाठी हा प्रवास दमवणारा असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

लॉर्ड्स कसोटीत तब्बल १५ नो बॉल टाकणाऱ्या बुमराहसाठी ‘या’ दिग्गजाचा मदतीचा हात, सांगितला उपाय

हेडिंग्ले कसोटीत पुनरागमनाच्या इराद्याने उतरणार इंग्लंड, असा असेल फलंदाजी क्रम

गंभीर आरोप! भारतीय खेळाडूंनी इंग्लंडच्या क्रिकेटरचा अडवला रस्ता, मैदानावर जात असताना मुद्दाम…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---