ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकाची पहिली फेरी शुक्रवारी (21 ऑक्टोबर) समाप्त झाली. अखेरच्या दिवशी ब गटात आयर्लंड व झिम्बाब्वे विजय मिळवत मुख्य फेरीत प्रवेश केला. तत्पूर्वी, अ गटातून श्रीलंका व नेदरलँड्स हे संघ मुख्य फेरीसाठी पात्र ठरलेले. पात्रता फेरीच्या निकालानंतर आता मुख्य फेरीचे चित्र देखील स्पष्ट झाले आहे. मुख्य फेरीत आता कोणता संघ कोणत्या संघाशी किती तारखेला खेळेल हे निश्चित झाले. यापैकी भारतीय संघ कोणत्या संघाची कधी खेळणार हे आपण जाणून घेऊया.
पात्रता फेरीच्या अ गटातील दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या नेदरलँड्स आणि ब गटातील अव्वल स्थानी राहिलेल्या झिम्बाब्वे यांचा मुख्य फेरीच्या ब गटात समावेश केला गेला आहे. यापूर्वी ब गटामध्ये भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका व बांगलादेश हे संघ सामील आहेत. आता नेदरलँड्स व झिम्बाब्वेच्या येण्याने ब गटातील सुपर 12 फेरी रंगेल. या गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
भारतीय संघ आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर करेल. त्यानंतर दुसरा सामना भारतीय संघ सिडनीच्या सिडनी क्रिकेट मैदानावर नेदरलँड्सविरुद्ध 27 ऑक्टोबर रोजी खेळेल. भारतीय संघ या गटातील सर्वात महत्त्वाचा सामना 30 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत या ठिकाणी खेळणार आहे. 2 नोव्हेंबर रोजी आणखी एक आशियाई संघ बांगलादेश विरुद्ध भारत ऍडलेड येथे दोन हात करेल. तर, भारत आपला साखळी फेरीतील अखेरचा सामना 6 नोव्हेंबर रोजी झिम्बाब्वेविरूद्ध मेलबर्न येथे खेळेल.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
साधा सुधा नाय विश्वचषकातील दुसरा लांब षटकार हाय, ओडियन स्मिथच्या जबरदस्त शॉटने वेधले सर्वांचे लक्ष
गोळीच्या वेगाने चाललेला चेंडू पठ्ठ्याने झेलून दाखवला, पाहा टी20 विश्वचषकातील अफलातून कॅच