Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गोळीच्या वेगाने चाललेला चेंडू पठ्ठ्याने झेलून दाखवला, पाहा टी20 विश्वचषकातील अफलातून कॅच

October 21, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Wesley-Madhevere

Photo Courtesy: Instagram/ICC


टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना शुक्रवारी (दि. 21 ऑक्टोबर) स्कॉटलंड विरुद्ध झिम्बाब्वे संघात पार पडला. होबार्ट येथे पार पडलेल्या या सामन्यात झिम्बाब्वे संघाचा खेळाडू वेसली मधेवरे याने शानदार झेल घेतला. या सामन्यात तोच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. आता त्याने घेतलेला झेलाचा व्हिडिओ सर्वत्र जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

वेसली मधेवरेचा झेल
झाले असे की, या सामन्यात फलंदाजीला उतरलेल्या स्कॉटलंड संघाच्या डावाचे पाचवे षटक सुरू होते. हे षटक झिम्बाब्वे संघाचा गोलंदाज रिचर्ड नगारवा (Richard Ngarava) टाकत होता. यावेळी षटकाचा पहिल्याच चेंडूवर फलंदाज मॅथ्यू क्रॉस याने मिडविकेटच्या दिशेने थेट फटका मारला. हा शॉट पाहून असे वाटत होते की, चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे जाईल. मात्र, तसे काहीच झाले नाही. मिडविकेटवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या वेसली मधेवरे (Wesley Madhevere) याने डाईव्ह मारली आणि चेंडू झेलला. कुणालाही अपेक्षा नसताना वेसलीच्या या अफलातून झेलामुळे झिम्बाब्वे संघ सेलिब्रेशन करू लागला. क्रॉसलाही या झेलावर विश्वास बसला नव्हता. त्याने यावेळी फक्त 7 चेंडूत 1 धाव करत क्रॉस तंबूत परतला. याचा व्हिडिओ आयसीसीने इंस्टाग्रामवरही शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

स्कॉटलंड संघाचा डाव
स्कॉटलंड संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. निर्धारित 20 षटकांमध्ये स्कॉटलंड संघाने 6 विकेट्स गमावत 132 धावा चोपल्या. विशेष म्हणजे, ही पहिलीच वेळ होती, ज्यामध्ये कोणत्याही डावात एकही षटकार मारला गेला नाही. स्कॉटलंड संघासाठी जॉर्ज मुन्से याने सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने 51 चेंडूत 54 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. यावेळी त्याने 7 चौकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला 30 धावांचा आकडाही पार करता आला नाही.

दुसरीकडे, झिम्बाब्वे संघाने यावेळी शानदार क्षेत्ररक्षण केले. मधेवरेव्यतिरिक्त मिल्टन शुंभा आणि सिकंदर रझा यानेही शानदार झेल घेतला. झिम्बाब्वेकडून गोलंदाजी करताना तेंडाई चटारा आणि रिचर्ड नगारवा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या दिग्गजाने केले शिक्कामोर्तब! म्हणतोय, “केएल राहुल जगातील नंबर वन फलंदाज”
सलामीवीरांनो सावधान! आफ्रिदीच्या यॉर्करने अफगाणिस्तानच्या फलंदाजाला केलंय जखमी, माजी प्रशिक्षक म्हणतोय…


Next Post
Ireland Cricket Team T20 WC

टी20 विश्वचषकात दोन चॅम्पियन संघ पराभूत, 'त्या' तीन सामन्यांचे निकाल तर डोके चक्रावणारे

Photo Courtesy: Twitter/ICC

मुख्य फेरीचे अखेरचे तिकीट झिम्बाब्वेकडे! स्कॉटलंडला नमवत केली ऐतिहासिक कामगिरी

Odean-Smith

साधा सुधा नाय विश्वचषकातील दुसरा लांब षटकार हाय, ओडियन स्मिथच्या जबरदस्त शॉटने वेधले सर्वांचे लक्ष

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143