Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंग्लंडच्या दिग्गजाने केले शिक्कामोर्तब! म्हणतोय, “केएल राहुल जगातील नंबर वन फलंदाज”

October 21, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
KL-Rahul

Photo Courtesy : bcci.tv


ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकातील मुख्य फेरीचे सामने 22 ऑक्टोबरपासून सुरू होतील. त्यामुळे क्रिकेटच्या त्यांना जगातील बड्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची पर्वणी मिळणार आहे. त्याचवेळी माजी क्रिकेटपटू आणि समीक्षकांनी आपापले अंदाज लावण्यास सुरुवात केलीये. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याने देखील या विश्वचषकात त्याची नजर असलेल्या खेळाडूंबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले.

पीटरसन याने नुकतेच एका मासिकासाठी लिहिलेल्या स्तंभामध्ये म्हटले,

“भारताचा केएल राहुल माझा खूप आवडता क्रिकेटपटू असून, मला वाटते तो सध्या जगातील क्रमांक एकचा फलंदाज आहे. तो अत्यंत शानदार पद्धतीने खेळतो. चेंडू स्विंग, सीम अथवा चांगल्या उंचीने येत असेल तर तो उत्कृष्ट तंत्राद्वारे त्याचा सामना करतो. त्याची ही शैली मला योग्य वाटते.”

पीटरसन व्यतिरिक्त भारताचा माजी सलामीवीर व प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक आकाश चोप्रा यानेही राहुलचे कौतुक केले होते. आपल्या युट्युब चॅनलवर बोलताना चोप्रा म्हणालेला,

“मला वाटते की, केएल राहुल या विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक धावा बनवेल. ऑस्ट्रेलियातील मैदाने आणि खेळपट्ट्या त्याच्या खेळाला साजेशा अशा आहेत.”

विश्वचषकाआधी तितक्या चांगल्या फॉर्ममध्ये नसलेल्या राहुलने ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर शानदार फॉर्म दाखवला आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने शानदार अर्धशतक झळकावलेले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यातही तो चमकलेला. केवळ 27  चेंडूवर अर्धशतक पूर्ण केल्यावर त्याने एकूण 33 चेंडूचा सामना करत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 57 धावांची खेळी केली होती. विश्वचषकात तो कर्णधार रोहित शर्मासह भारतीय संघासाठी सलामी देताना दिसेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सलामीवीरांनो सावधान! आफ्रिदीच्या यॉर्करने अफगाणिस्तानच्या फलंदाजाला केलंय जखमी, माजी प्रशिक्षक म्हणतोय…
बीसीसीआय अध्यक्ष बनताच रॉजर बिन्नींचे गांगुलीबद्दल मोठे विधान; म्हणाले, ‘त्याने भारतीय क्रिकेटचा…’


Next Post
Virat Kohli and MS Dhoni

हर्षा भोगलेंनी निवडला टी-20 विश्वचषकातील सर्वकालीन सर्वोत्तम संघ, फक्त एका भारतीयाला दिलीये संधी

Wesley-Madhevere

गोळीच्या वेगाने चाललेला चेंडू पठ्ठ्याने झेलून दाखवला, पाहा टी20 विश्वचषकातील अफलातून कॅच

Ireland Cricket Team T20 WC

टी20 विश्वचषकात दोन चॅम्पियन संघ पराभूत, 'त्या' तीन सामन्यांचे निकाल तर डोके चक्रावणारे

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143