‘इंडिया का त्योहार’ म्हटल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. गुरुवारी (१८ फेब्रुवारी) या हंगामाचा मिनी लिलाव चेन्नईच्या ग्रँड चोला या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या लिलावात किंग खानच्या कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशचा सर्वोत्तम अष्टपैलू शाकिब अल हसनसाठी कोटीत पैसा मोजला.
साल २०१८ नंतर प्रथमच आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या फिरकीपटू शकिबवर पंजाब किंग्सने बोली लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर, त्याचा पहिला आयपीएल संघ कोलकताने लिलावात उडी घेतली. काहीवेळ रस्सीखेच झाल्यानंतर ३ कोटी २० लाख रुपयांना तो कोलकाताचा भाग झाला. याबरोबरच सुरुवातीला खरेदीदार न मिळालेल्या फिरकी गोलंदाज हरभजन सिंगला त्याच्या मूळ किंमतीत त्यांना विकत घेतले.
या दोघांव्यतिरिक्त बेन कटिंग, करुण नायर, पवन नेगी, वेंकटेश अय्यर, शेल्डन जॅक्सन आणि वैभव अरोरा यांना कोलकाताने आपल्या गोटात सामील केले. यासह तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची स्वप्ने पाहणाऱ्या कोलकाताचा संघ अजून मजबूत बनला आहे.
Hi 👋@Cuttsy31 @ShelJackson27 @Sah75official @karun126 @harbhajan_singh @iampawannegi #KKR #HaiTaiyaar #IPLAuction #IPL2021 pic.twitter.com/Zr4ykU4UNu
— KolkataKnightRiders (@KKRiders) February 18, 2021
कोलकाता नाईट रायडर्स – २५ खेळाडू (८ परदेशी)
लिलावाआधी संघात कायम असलेले खेळाडू –
दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुभमन गिल, सुनील नारायण, इयॉन मॉर्गन (कर्णधार), पॅट कमिन्स, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, टीम सिफर्ट.
लिलावात खरेदी केलेले खेळाडू –
शाकिब अल हसन(३.२० कोटी), हरभजन सिंग(२ कोटी), बेन कटिंग(७५ लाख), करुण नायर(५० लाख), पवन नेगी(५० लाख), वेंकटेश अय्यर(२० लाख), शेल्डन जॅक्सन (२० लाख), वैभव अरोरा (२० लाख).
महत्त्वाच्या बातम्या-