---Advertisement---

मराठमोळ्या केदार जाधवची सनरायझर्स हैदराबादमध्ये दिमाखात एन्ट्री, बघा कशी आहे नवी ‘ऑरेंज आर्मी’

On: शुक्रवार, फेब्रुवारी 19, 2021 9:30 PM
---Advertisement---

आयपीएल प्रेमींसह क्रिकेटपटू आणि सहभागी फ्रँचायझीदेखील येत्या चौदाव्या हंगामासाठी आतुर आहेत. गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नईच्या ग्रँड चोला या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या मिनी लिलावासह आयपीएलचा एक टप्पा संपला. या लिलावात डेविड वॉर्नरच्या नेतृत्त्वाखालील सनरायझर्स हैदाराबाद संघाने सर्वात कमी खेळाडू खरेदी केले.

चेन्नई सुपर किंग्जने मुक्त केलेला केदार जाधव लिलावाच्या पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिला. परंतु दुसऱ्या फेरीत २ कोटींच्या मूळ किंमतीसह त्याला विकत घेण्याचे धाडस हैदराबादने दाखवले. त्यामुळे मागील काही हंगामात फ्लॉप ठरलेल्या जाधवकडून हैदराबादला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. जाधवव्यतिरिक्त मुजीब उर रेहमान आणि जे सुचिथ यांना हैदाराबादने खरेदी केले.

गतवर्षी वॉर्नरच्या नेतृत्त्वाखाली प्लेऑफपर्यंत धडक मारणारा हा संघ आपल्या दुसऱ्या विजेतेपदासाठी आसुललेला आहे. २०१६ साली पहिल्यांदा त्यांनी आयपीएल चषक जिंकला होता. परंतु यंदा जिवाचे रान करत चषकावर नाव कोरण्यासाठी हा संघ प्रयत्नशील असेल.

सनरायझर्स हैदराबाद – २५ खेळाडू (८ परदेशी)

लिलावाआधी संघात कायम असलेले खेळाडू –
डेविड वॉर्नर, केन विलियम्सन, मनिष पांडे, वृद्धिमान साहा, अभिषेक शर्मा, बेसिल थँपी, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेअरस्टो, मोहम्मद नबी, रशीद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर ,अब्दुल समद, मिशेल मार्श, जेसन होल्डर, प्रियम गर्ग, विराट सिंग.

लिलावात खरेदी केलेले खेळाडू –  
केदार जाधव(२ कोटी), मुजीब झारदान(१.५० कोटी), जे सुचिथ(३० लाख)

महत्त्वाच्या बातम्या-

पहिल्या विजेतेपदासाठी उत्सुक पंजाब किंग्जने परदेशी खेळाडूंसाठी ओतलाय बक्कळ पैसा! पाहा संघातील एकूण खेळाडूंची यादी

बंगळुरू ते राजस्थान व्हाया मुंबई आणि पंजाब..! गोष्ट मॉरिसवर लागलेल्या १६.२५ कोटींच्या ऐतिहासिक बोलीची

इतिहासातील महागडा गोलंदाज ताफ्यात घेतल्याने बदलणार का राजस्थानचे नशीब? पाहा ‘ख्रिस मॉरिस’सह कसा आहे नवा संघ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---