अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात रोहित शर्मा याने भारतासाठी झंजावाती शतक ठोकले. रोहितने बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय संघासाठी 69 चेंडूत 121 धावा कुटल्या. हे त्याच्या टी-20 कारकिर्दीतील पाचवे शतक ठरले. शतकी खेळीनंतर रोहितचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात रोहित आणि मैदानी पंच विरेंद्र शर्मा यांच्यातील संभाषण ऐकता येत आहे.
हा व्हिडिओ भारताच्या डावातील सुरुवातीच्या षटकांमधला आहे. पंच विक्रांत शर्मा (Vikrant Sharma) यांनी षटकातील एक चेंडू थाय पॅडला लागल्याचे सांगितले होते. रोहितला मात्र आधी याविषयी कल्पना नव्हती असे या व्हिडिओत पाहायला मिळते. रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणतो, “अरे विरू, पहिला चेंडू थाय पॅड दिला काय? एवढी मोठी बॅट तर लागली आहे. आधीच नावावर दोन शुन्य लागले आहेत.” रोहितचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना हसू आवरणे कठीण झाले आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहित शुन्यावर बाद झाला असल्यामुळे त्याने असे वक्तव्य केले होते. पण लाईव्ह सामन्यातील रोहितचा हा जमेशीर अंदाज पाहून चाहतेही आनंद घेत आहेत.
Arey Viru, pehle wala Thigh pad Diya tha kya? Itna bada bat laga hai. Ek toh idhar 2 zero ho gaya hain.” – Rohit Sharma to umpire
😂😄😂 pic.twitter.com/ABwHlFJnE0— Zuhair (@zuh_dxb) January 17, 2024
भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. 20 षटकांमध्ये रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांच्या धमाकेदार खेळीमुळे भारतीय संघ 212 धावांपर्यंत पोहोचला. सुरुवातीच्या चार विकेट्स भारतीय संघाने अवघ्या 22 धावांवर गमावल्या होत्या. पण त्यानंतर रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांच्यात 190 धावांची नाबाद भागीदारी झाली. (Funny discussion between Rohit Sharma and umpire Vikrant Sharma in live match)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार.
अफगाणिस्तान – इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी, फरीद अहमद मलिक.