क्रिकेटच्या मैदानावर अनेक गोष्टी घडतात. कधी पावसामुळे सामना थांबतो, कधी चाहते सुरक्षा घेरा तोडून मैदानात येतात, तर कधी शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही. मात्र, याव्यतिरिक्त असे काही किस्से असतात, ज्याकडे प्रत्येकाचे लक्ष वेधले जाते. असेच काहीसे एका व्हायरल होत असलेल्या मजेशीर व्हिडिओत पाहायला मिळाले. या व्हिडिओत दिसते की, 18 सेंकदाच्या घाईगडबडीत 11 खेळाडू मिळून दोन फलंदाजांना धावबाद करू शकत नाहीत. यावेळी त्यांच्याकडे अनेक संधी असतात. चला तर जाणून घेऊया काय आहे नेमकं प्रकरण.
नेमकं काय घडलं?
सर्वांचे लक्ष वेधणारा हा व्हिडिओ एका युजरने शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत एका युजरने लिहिले आहे की, “कोण म्हणते क्रिकेट महान नाहीये.” झालं असं की, गोलंदाज गोलंदाजी करतो आणि फलंदाज हळूच चेंडू टोलवतो. यानंतर तो थांबत थांबत धाव घेण्यासाठी धावतो. दुसऱ्या बाजूला असणारा फलंदाजही धावतो. मात्र, स्ट्राईकवर असणारा फलंदाज अर्ध्या खेळपट्टीवर येऊन पुन्हा माघारी फिरतो. दुसऱ्या बाजूला असणारा फलंदाजही त्याच क्रीझवर पोहोचतो.
क्षेत्ररक्षक चेंडू फेकतो, पण चेंडू स्टंप्सवरही लागत नाही आणि कोणत्याही खेळाडूला तो चेंडू पकडून फलंदाजाला धावबाद करता येत नाही. यानंतर आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळतो. दुसर्या बाजूला असणारा फलंदाज यादरम्यान त्याच्या क्रीझवर पोहोचतो, तर यष्टीरक्षक फलंदाजही या गडबडीत नॉनस्ट्रायकर एन्डवर पोहोचतो. तो फलंदाजाला बाद करण्याच्या तयारीत असतो, पण तो यामध्ये अपयशी ठरतो.
पुढे नॉनस्ट्रायकर एन्डवरील फलंदाज आपल्या क्रीझवर पोहोचतो, तेव्हा ज्या फलंदाजाने शॉट मारलेला होता तोही धाव घेण्यासाठी अर्ध्या खेळपट्टीवर पोहोचतो. इथे नॉनस्ट्रायकर एन्डवरील फलंदाज हुशारी दाखवतो आणि धाव घेण्यापासून रोखतो. म्हणजेच धाव घेतली जात नाही आणि कुणीही धावबाद होत नाही. हा व्हिडिओ देशांतर्गत किंवा कसोटी सामन्यातील असल्याचे दिसत आहे. मात्र, हा कोणत्या सामन्यातील व्हिडिओ आहे, हे स्पष्ट झाले नाहीये. (funny incident on cricket ground see viral video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या ‘या’ खेळाडूचा नादच खुळा! वनडे ओपनर म्हणून ‘मोठ्या’ विक्रमात सचिन-रोहित अन् धवनलाही पछाडलं
‘बर्थडे बॉय’ सुरेश रैनाबद्दल ‘या’ खास 10 गोष्टी माहित आहेत का?






