---Advertisement---

द्विशतक होताच सचिनकडून साराचा शुबमनसोबत साखरपुडा फिक्स? ट्विट होतंय व्हायरल

On: गुरूवार, जानेवारी 19, 2023 4:36 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिकेला  बुधवारी (18 जानेवारी) सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर झाला. याच सामन्यात शुबमन गिल याने वादळी द्विशतक झळकावले. सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत असताना, काही चाहते सोशल मीडियावर त्याची मजा देखील घेऊ लागले आहेत.

भारतीय संघाचा सलामीवीर शुबमन गिल (Shubhaman Gill) याने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात धमाकेदार खेळी करत द्विशतक झळकावले. गिलने 149 चेंडूत 208 धावा केल्या. यासाठी त्याने 19 चाैकार तर 9 षटकार झळकावले. भारताकडून द्विशतक झळकावणारा शुबमन हा पाचवा खेळाडू ठरला आहे. त्यानंतर चाहत्यांनी त्याला भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची मुलगी व गिलची तथाकथित गर्लफ्रेंड सारा हिच्या नावाने ट्रोल करण्यास सुरुवात केली.

एका सोशल मीडिया हँडलवरून लिहिण्यात आले की, ब्रेकिंग न्यूज, सचिन तेंडुलकरने आपल्या मुलीच्या व शुबमन गिलच्या साखरपुड्याची घोषणा केली आहे.

अन्य एका हँडलवरून सचिनचा फोटो पोस्ट करत लिहिले गेले, ‘शुबमन माझ्याकडून हे नातं 200 टक्के पक्के झाले.’

 

तसेच अन्य काही हँडलवरून अशाच प्रकारे गमतीदार पोस्ट केल्या गेल्या आहेत.

शुबमन गिल व सारा बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड असल्याच्या बातम्या अनेकदा येत असतात. सारा अनेकदा शुबमनच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना दिसते. ‌मात्र अद्याप कोणीही या नात्याची कबुली दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी शुबमनचे नाव अभिनेत्री सारा अली खान हिच्याशी देखील जोडले गेले होते. श्रीलंकेविरुद्ध पुणे येथे झालेल्या सामन्यात चाहत्यांनी गिल क्षेत्ररक्षण करत असताना सारा-सारा असा उद्घोष ही केलेला.

(Funny Tweets On Tweeter After Shubman Gill Double Century Talk About Sara Tendulkar)

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या महान फलंदाजांमध्ये शुबमन गिलचेही नाव सामील, सचिनलाही टाकले मागे   
‘…तेव्हा वाटले मी द्विशतक करू शकतो’, सामनावीर शुबमन गिलची खास प्रतिक्रिया

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---