क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा बऱ्याच गमतीदार गोष्टी पाहायला मिळत असतात. क्षेत्ररक्षण, गोलंदाजी अथवा फलंदाजीत हे प्रसंग उद्भवतात. अनेकदा अनावधानाने देखील काही अशा घटना घडतात, ज्यामुळे पाहणाऱ्यांची हसून पुरेवाट होते. इंग्लंडमधील एका स्थानिक स्पर्धेत देखील अशीच एक घटना पाहायला मिळाली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.
आणि धावबाद करणाऱ्यावर फेकली बॅट
इंग्लंडमधील एका स्थानिक स्पर्धेतील व्हिडिओ समोर आला आहे. वरिष्ठांच्या एका स्पर्धेत इमाम्बा संघातील फलंदाज इवान्स व ऍडम फलंदाजी करत होते. संघाची धावसंख्या ४ षटकांनंतर ३८ झाली असताना. पाचवे षटक टाकण्यासाठी विरोधी संघाचा चेऊंग हा गोलंदाजी करण्यासाठी आला.
https://twitter.com/ChloeAmandaB/status/1439579713043763214
षटकातील दुसरा चेंडू चेऊंगने टाकला असताना ऍडमने तो तटवला. इवान्स हा धाव घेण्यासाठी अर्ध्यापेक्षा जास्त खेळपट्टीवर आला. मात्र, ऍडम याने अचानकपणे धाव घेण्यास नकार दिल्याने इवान्स धावबाद झाला. इवान्सला धावबाद झाल्याने भावना अनावर झाल्या. त्याने रागाच्या भरात आपली बॅट फिरवली. मात्र, ती बॅट दुर्दैवाने ऍडमला जाऊन लागली. या घटनेनंतर विरोधी संघातील खेळाडू देखील पोट धरून हसत होते. सुदैवाने बॅट लागल्यानंतरही ऍडमला दुखापत झाली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
गेल म्हणतोय, “मी उद्या पाकिस्तानला जात आहे, माझ्याबरोबर कोण येणार?”
युएईत फक्त ऋतुराजचा डंका! कोणालाही न जमलेली अद्वितीय कामगिरी केली नावे






