पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा आणि कसोटी मालिकेतील शेवटचा सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम येथे खेळवला गेला. या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेवर ९५ धावांनी विजय मिळवला. यासह दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० असे निर्भेळ यश मिळवले.
मैदानात घडला विनोदी प्रसंग
अशातच, पाकिस्तान संघाचा अनुभवी फलंदाज अजहर अली याने जे केले ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. सामना सुरू असताना दक्षिण आफ्रिका संघाच्या दुसऱ्या डावातील २२वे षटक सुरू होते. त्यावेळी मैदानात एका मांजरीनी प्रवेश केला आणि अजहर अली तिला बाहेर काढण्यासाठी तिच्या मागे पळाला.
त्यावेळी पाकिस्तान संघाचा यष्टिरक्षक मोहम्मद रिजवान याने मस्करी करतांना म्हंटले की, “अज्जू भाई तिची चाचणी नाही केली आहे. बायो बबल मध्ये नाही आहे ती.” रिजवानने केलेल्या या टिप्पणीवर सर्वच खेळाडू हसायला लागले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
A cat appears on the boundary edge. Azhar Ali starts to chase it off the ground – Mohammad Rizwan to Azhar Ali "don't chase it, it's not been tested and is not in our bubble" #PAKvSApic.twitter.com/DmwsJHJdMV
— Mazhar Ali (@mazhar5ali) February 7, 2021
मोहम्मद रिजवानने झळकावले कारकिर्दीतील पहिले शतक
या सामन्यात पाकिस्तान संघाकडून फलंदाज मोहम्मद रिजवान याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पाहिले शतक झळकावले. याचबरोबर नौमान अली याच्यासोबत मिळून ९व्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली. ज्यामुळे पाकिस्तान संघाने दुसऱ्या डावात २९८ धावा केल्या. रिजवान याने २०४ चेंडूत १५ चौकरांच्या साहाय्याने ११५ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्या डावात २०१ धावा केल्या होत्या. तर पाकिस्तान संघाने २७२ धावा केल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या:
भन्नाट कॅच! स्टोक्सने घेतला जसप्रीत बुमराहचा घेतला अफलातून एकहाती झेल, पाहा व्हिडिओ
घरासोबत वासेही फिरले! ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन यष्टिरक्षण सोडून चक्क करतोय गोलंदाजी, पाहा व्हिडिओ
जो रुटची कमाल! १०० कसोटीत केलाय असा कारनामा की गावसकर, सचिन, कॅलिससारख्या दिग्गजांना पडलाय भारी






