पुणे: आयडीयाज् अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर संघाने अॅटॉस् संघाचा तर सायबेज संघाने टाटा टेक्नोलॅजीज् संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
व्हिजन क्रिकेट अकादमी मौदान येथे झालेल्या सामन्यात निखिल भुजबळच्या नाबाद 76 धावांच्या बळावर गालाघर संघाने अॅटॉस् संघाचा 5 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना अॅटॉस् संघाने 20 षटकात 5 बाद 167 धावा केल्या. यात महेश भोसलेने नाबाद 43 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. 167 धावांचे लक्ष निखिल भुजबळच्या नाबाद 76 धावांसह गालाघर संघाने 18 षटकात 5 बाद 169 धावा करून सहज पुर्ण केले. गौरव बाजपैने नाबाद 45 धावा करून निखिलला सुरेख साथ दिली. नाबाद 76 धावा करणारा निखिल भुजबळ सामनावीर ठरला.
दुस-या सामन्यात हर्षल वाडकरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर सायबेज संघाने टाटा टेक्नोलॅजीज् संघाचा 6 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना टाटा टेक्नोलॅजीज् संघाने 20 षटकात 8 बाद 134 धावा केल्या. यात राकेश वाल्मिकीने 40 व कुमार वाल्हेकरने 35 धावा केल्या. हर्षल वाडकर व अभिषेक गोसावी यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. 134 धावांचे लक्ष प्रतिक पंडितच्या 36, संकेत ऐकलच्या नाबाद 33 व अविनाश माळीच्या नाबाद 32 धावांसह सायबेज संघाने 18.4 षटकात 4 बाद 135 धावा करून पुर्ण केले. 24 धावांत 3 गडी बाद करणारा हर्षल वाडकर सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
अॅटॉस् – 20 षटकात 5 बाद 167 धावा(संदिप भागवत 21, विशाल स्लाथीया 22, वौभव पेडणेकर 30, महेश भोसले नाबाद 43, सुमेध मन्वर 21, शुबेंदू पांडे 2-27) पराभूत वि गालाघर- 18 षटकात 5 बाद 169 धावा(निखिल भुजबळ नाबाद 76, शुबेंदू पांडे 22, गौरव बाजपै नाबाद 45, मंगेश सांगोडकर 3-14) सामनावीर- निखिल भुजबळ
गालाघर संघाने 5 गडी राखून सामना जिंकला.
टाटा टेक्नोलॅजीज् – 20 षटकात 8 बाद 134 धावा(राकेश वाल्मिकी 40, कुमार वाल्हेकर 35, हर्षल वाडकर 3-24, अभिषेक गोसावी 3-24) पराभूत वि सायबेज- 18.4 षटकात 4 बाद 135 धावा(प्रतिक पंडित 36, संकेत ऐकल नाबाद 33, अविनाश माळी नाबाद 32, राकेश वाल्मिकी 2-17)सामनावीर- हर्षल वाडकर
सायबेज संघाने 6 गडी राखून सामना जिंकला.