---Advertisement---

तिरंदाजीपटू दीपिका कुमारी आणि गौतम गंभीर आमने-सामने, तिरंदाजी मैदान तोडण्याचा घातला जातोय घाट

---Advertisement---

पूर्व दिल्ली येथील यमुना क्रीडा संकुलाबद्दल वाद निर्माण झाला आहे. स्थानिक खासदार गौतम गंभीर यांच्यावर क्रिकेटला चालना देण्यासाठी इतर खेळांची मैदाने नष्ट केल्याचा आरोप केला जातोय. प्रसिद्ध तिरंदाजीपटू व जागतिक महिला तिरंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या दीपिका कुमारी हिने या विषयावर ट्वीट केले होते, त्यानंतर गंभीर यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. याशिवाय यमुना क्रीडा संकुलामध्ये बर्याच दिवसांपासून धावण्या-फिरण्यासाठी येणारे वयोवृद्ध तसेच मुलेही निषेध करीत आहेत. त्यांचा असा आरोप आहे की, क्रिकेट स्टेडियमसाठी धावण्याचा ट्रॅक तोडण्यात आला आणि स्टेडियमला ​​कुलूप लावले गेले. यमुना क्रीडा संकुलासंदर्भात तब्बल दीड वर्षांपासून वाद सुरू आहे.

तोडण्यात आला धावण्याचा ट्रॅक
दोन दिवसांपूर्वी यमुना क्रीडा संकुलाचा व्हिडिओ शेअर करताना गौतम गंभीर म्हणाले होते की, ‘जाहिरातबाजी मेहनतीची जागा घेऊ शकत नाही. पूर्व दिल्ली प्रो क्रिकेटसाठी सज्ज आहे.’

अलीकडेच या मैदानावर फ्लडलाइट्स देखील बसविण्यात आले आहेत. गौतम गंभीर आयपीएलच्या दृष्टीने येथील क्रिकेट स्टेडियम मोठे बनवित असल्याचे सूत्रांकडून समजते. यासाठी क्रिकेट स्टेडियमच्या सभोवती बांधलेला ४०० मीटर धावण्याचा ट्रॅक तोडून क्रिकेट स्टेडियममध्ये विलीन करण्यात आला.

https://twitter.com/GautamGambhir/status/1412813251977441283

दीपिका कुमारीने व्यक्त केला शोक
सूत्रांच्या माहितीनुसार, क्रिकेट आणि तिरंदाजी मैदाना दरम्यानची भिंत तोडून तिरंदाजी मैदानाच्या काही भागावर व्हीआयपी पार्किंग क्षेत्र म्हणून बनविण्याची योजना होती. ही योजना पूर्ण झाल्यास, वाऱ्याच्या प्रवाहात बदल होण्याचा धोका आहे. याचा परिणाम तिरंदाजांच्या कामगिरीवर होऊ शकतो. याच कारणास्तव, दीपिका कुमारी हिने ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.

दीपिका कुमारीने ट्विट केले की, ‘२०१० राष्ट्रकुल स्पर्धेत या मैदानावर खेळून मी दीपिका बनली. कृपया या तिरंदाजी मैदानाचे क्रिकेट मैदानात रुपांतर करू नका. हे आशिया खंडातील सर्वोत्तम तिरंदाजी मैदान आहे जेथे आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धा आयोजित केल्या जाऊ शकतात.’

वयाच्या १६ व्या वर्षी दीपिकाने दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. दीपिका सध्या जगातील सर्वोत्तम तिरंदाजीपटू आहे. आगामी टोकियो ऑलिंपिकमध्ये तिच्याकडून भारताला सुवर्ण पदकाची अपेक्षा असेल. दीपिका व्यतिरिक्त अभिषेक वर्मा यानेदेखील या विषयावर ट्विट केले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

फलंदाजी प्रशिक्षकानंतर श्रीलंका संघाचा आणखी एक सदस्य कोरोनाबाधित, मालिकेच्या आयोजनावर उभे राहिले प्रश्नचिन्ह

भारताचे असे तीन फलंदाज जे वनडेत कधी बाद झाले नाहीत

मोठी बातमी! बहुप्रतिक्षित भारत-श्रीलंका वनडे, टी२० मालिका पुढे ढकलली जाणार, ‘हे’ आहे कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---