---Advertisement---

KKR च्या विजयात डिकॉकची धमाकेदार खेळी, गंभीरचा मोठा विक्रम मोडला

On: गुरूवार, मार्च 27, 2025 4:43 PM
---Advertisement---

कोलकाता नाईट रायडर्स संघाने राजस्थानला पराभूत करून हंगामात पहिला विजय प्राप्त केला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी क्विंटन डिकॉकने धमाकेदार पारी खेळली. त्याने 97 नाबाद धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कोणत्याही फलंदाजाचा धावांचा पाठलाग करताना हा सर्वात मोठा स्कोर आहे. याआधी हा रेकॉर्ड कोलकाता नाईट रायडर्स संघाचा माजी खेळाडू मनीष पांडे यांच्या नावावर होता. आयपीएल 2014 मध्ये अंतिम सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध मनीष पांडेने 94 धावा केल्या होत्या.

आता क्विंटन डिकॉकने मनीष पांडे याला मागे टाकले आहे. या खेळाडूंच्या यादीत क्विंटन डिकॉक आणि मनीष पांडे क्रिस लिन सोबत तिसऱ्या स्थानावर आहेत. आयपीएल 2017 हंगामात गुजरात लॉयन्स विरुद्ध क्रिस लिनने 93 नाबाद धावा केल्या होत्या. त्याच्यानंतर मनिंदर बिसला याचा नंबर आहे. आयपीएल 2013 हंगामात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मनिंदर बिसलाने 92 धावा केल्या होत्या. या यादीत पाचव्या स्थानी कोलकाता नाईट रायडर्स संघाचे माजी कर्णधार गौतम गंभीर आहेत. आयपीएल 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गौतम गंभीर यांनी 90 नाबाद धावा केल्या होत्या.

कोलकाता नाईट रायडर्स संघाने क्विंटन डिकॉकच्या खेळीमुळे राजस्थान रॉयल्सला 8 विकेट्सने पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 9 विकेट्स गमावून 151 धावा केल्या. नंतर धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने 17.3 षटकात 2 विकेट्स गमावून विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी डिकॉकने सर्वात जास्त 61 चेंडूत 97 धावा केल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---