आशिया चषक 2023 साठी भारताचा 17 सदस्यीय संघ घोषित झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून आशिया चषक आणि संघात अधिक डावखुरे फलंदाज निवडले पाहिजे, अशा चर्चा सुरू होत्या. मात्र भारताचा माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीर याने हा मुद्दा खोडून काढला आहे. स्वतः डावखुरा फलंदाज असणाऱ्या गौतम गंभीरच्या मते फलंदाजा फॉर्म संघासाठी सर्वात महत्वाचा आहे.
गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने आशिया चषकासाठी संघ निवडल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत माजी दिग्गज म्हणाला, “जर तिलक वर्माला संघात निवडले आहे, तर त्याला नक्कीच काही सामन्यांमध्ये खेळण्याची संधी दिली पाहिजे. खेळाडू डावखुरू असो किंवा उजखुरा त्याकडे लक्ष न देता त्याचा फॉर्म पाहिला पाहिजे. फॉर्ममध्ये असणाऱ्या खेळाडूला संघात ठेवले पाहिजे. कारण मी आधीही सांगितलं आहे की, फॉर्म खूप महत्वाचा आहे. कोण डावखुरा, कोण उजखुरा आणि त्यांच्यातील कोणत्या खेळाडूला संघात ठेवले पाहिजे, हा वाद निरर्थक आहे. आपण गुणवत्ता पाहतो, तुम्ही कोणत्या हाताने खेळता हे नाही.”
गंभीरने पुढे आशिया चषकासाठी निवडलेल्या खेळाडूंचा उल्लेख केला. तो म्हणाला, “तिलक वर्मा चांगल्या फॉर्ममध्ये असेल, तर त्याला संघात घ्या. जर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल चांगल्या फॉर्ममध्ये असतील, तर त्यांना खेळवा. असे कुठे लिहिले नाहीये की, संघात डावखुरे फलंदाज हवेच आहेत. अशी कुठली चर्चा सुरू झाली पाहिजे, असेही मला वाटत नाही. जर डावखुऱ्या फलंदाजांबाबत बोलायचेच झाले, तर यशस्वी जयसवाल कुठे आहे. तो देखील डावखुरा फलंदाज आहे.” (Gambhir’s Heart-Winning Answer on Left-Right Handers Debate! Read what the left-handed batsman had to say)
आशिया चषकासाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्ण.
राखीव खेळाडू – संजू सॅमसन
महत्वाच्या बातम्या –
“धोनीने रोहितला 2011 वर्ल्डकपसाठी डावललेले”, माजी निवडसमिती सदस्याचा धक्कादायक खुलासा
चहलची संघात निवड न झाल्याने पत्नी धनश्री संतापली, सोशल मीडियावर विचारला तिखट प्रश्न