पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच खेळली गेली. उभय संघांतील हे दोन्ही कसोटी सामने अनिर्णित राहिले आणि ट्रॉफी दोन्ही संघांमध्ये शेअर करण्यात आली. या मालिकेत सर्वाधिक प्रभावित कोणत्या खेळाडूने केले असेल, तर ते पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमद याने. सरफराजचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत अहमदचे त्याच्या पत्नीकडे पाहण्याच्या नादात खेळाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते.
उभय संघांतील दुसऱ्या कसोटी सामन्यात हा प्रसंग घडल्याचे सांगितले जात आहे. हा सामना कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर खेळला गेला. सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात अप्रतिम खेळी करताना दिसला. अहमद मागच्या अनेक वर्षांत पाकिस्तानसाठी एकही कसोटी सामना खेळू शकला नव्हता. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध त्याने संघात पुनरागमन करत जबरदस्त प्रदर्शन केले. याच पार्श्वभूमीवर अहमदचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यादरम्यानच अहमदचा एक व्हिडिओ समोर येत आहे. व्हिडिओत सरफराज मैदानातील स्क्रीनवर दिसणाऱ्या त्याच्या पत्नीकडे पाहताना दिसत आहे.
कसोटी सामना सुरू असताना न्यूझीलंडचा अष्टपैलू डॅरिल मिचेल गोलंदाजी करत होता. सरफराज नॉन स्ट्राईक एन्डवर उभा होता. मिचेल चेंडू टाकण्यासाठी धावत आला. मात्र सरफराज त्याच्या पत्नीकडे पाहत असल्यामुळे मिचेलला चेंडू टाकता आला नाही. मिचेलने त्याचा रनअप पूर्ण केला असला, तरी चेंडू टाकला नाही. मिचेल थांबल्यानंतर त्याने सरफराजला विचार देखील की, तो खेळण्यासाठी तयार आहे की नाही? या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला आहे. चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, कर्णधारपद गमावल्यानंतर सरफराज अहमगदला पाकिस्तानच्या संघातून देखील गलण्यात आले होते. तीन वर्ष संघातून बाहेर राहिल्यानंतर सरफराजने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पुनरागमन केले. त्याला दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत मालिकावीर पुरस्कार देखील मिळाला. मालिकेतील चार डावांमध्ये सरफराजने 83.75 च्या सरासरीने 335 धावा केल्या. ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून तीन अर्धशतक आणि एक शतक निघाले. याच अप्रतिम प्रदर्शनानंतर त्याला संघात आघामी मालिकांसाठीही संधी मिळेल, अशी पूर्ण शक्यता वर्तवली जात आहे. (Game stopped because of Rasfaraz Ahmed! The Pakistani legend was watching his wife during the live match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हद्दच केली! पायात चप्पल घालून शाकिब अल हसन खेळपट्टीवर, पंचांसोबत वाद घातल्यानंतर मोठी कारवाई
पक्की माहिती, पंत नाही खेळणार आयपीएल! सौरव गांगुलींनी केले स्पष्ट