भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) हे या पदावरून पायउतार होऊ शकतात. त्यांच्या व्यतिरिक्त, बोर्ड सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ ऑक्टोबर २०२२ मध्ये संपणार आहे. अशा स्थितीत या दोघांच्या जागी बोर्डाचा नवा अध्यक्ष आणि सचिव नेमला जातो की, गांगुली-शहा यांच्याकडे पुन्हा जबाबदारी येते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये गांगुली यांना बीसीसीआयचे अध्यक्ष बनवण्यात आलेले. त्याआधी ते बंगाल क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होते.
सौरव गांगुली हे २०१५ पासून बंगाल क्रिकेट असोसिएशनशी संबंधित होते. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांना जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयचे अध्यक्ष बनवण्यात आले. एका प्रमुख वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, त्यांचा कार्यकाळ या वर्षी ऑक्टोबरमध्ये पूर्ण होणार आहे. अशा स्थितीत त्यांचीही कार्यमुक्ती होऊन बीसीसीआयला नवा अध्यक्ष मिळू शकतो. गांगुली यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने मोठे यश संपादन केले.
भारतीय संघाला मिळाले मोठे यश
गांगुली यांचे आणखी एक मोठे यश राहुल द्रविड यांच्या रूपात आले. राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) चे प्रमुख म्हणून बंगळुरूमध्ये काम करत होते, त्यानंतर गांगुली यांनी त्यांना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी घेण्यास राजी केले. इतकेच नाही तर, गांगुली यांनी माजी भारतीय दिग्गज व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याशीही बोलून त्यांचे एनसीएमध्ये सामील होण्यासाठी मन वळवले.
विराट कोहलीशी झाला वाद
त्याचवेळी माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीशी संबंधित नुकत्याच झालेल्या वादामुळे त्यांना मोठा झटका बसला आहे. विराट कोहलीने दावा केला होता की, त्याच्या टी२० कर्णधारपदाबाबत बोर्डाशी कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. दरम्यान, गांगुली यांनी सांगितलेले की, मी विराटला टी२० चे कर्णधारपद सोडू नये अशी विनंती केली होती. याशिवाय, बीसीसीआय आतापर्यंत अनेक वेळा आश्वासन देऊनही महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएल आयोजित करण्यात अपयशी ठरली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हरभजन सिंगने निवडली त्याची ‘ऑल टाइम इलेव्हन’; विराटला जागा दिली, पण नेतृत्त्वपद नाही (mahasports.in)
“हा विराटने बनविलेला संघ, त्यामुळे…” विश्वविजेत्या खेळाडूची रोचक प्रतिक्रिया (mahasports.in)
ठरलं बर का! या दिवशी ‘हिटमॅन’ पुन्हा दिसणार निळ्या जर्सीत (mahasports.in)