Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ठरलं बर‌ का! या दिवशी ‘हिटमॅन’ पुन्हा दिसणार निळ्या जर्सीत

January 17, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
rohit

Photo Courtesy: Twitter/BCCI


भारतीय संघाचा (team india) महत्वाचा भाग आणि दिग्गज फलंदाज रोहित शर्मा (rohit sharma) सध्या दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. काही दिवसांपूर्वी रोहितला भारताच्या टी२० आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोपवले गेले होते. सोबतच त्याला कसोटी संघाचे उपकर्णधारपद देखील दिले गेले होते. रोहितच्या फिटनेसविषयी मागच्या काही दिवसांपूर्वी माहिती समोर आली होती आणि तो तंदुरुस्त होत असल्याचे समजले होते. आता बीसीसीआयच्या एका सूत्राने त्याच्या फिटनेसविषयी महत्वाचा खुलासा केला आहे.

दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी रोहितच्या डाव्या पायाच्या मांसपेशी ताणल्या गेल्या आणि याच कारणास्तव त्याला विश्रांती घ्यावी लागली. तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) दुखापतीवर काम करत आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेतून बाहेर झाल्यानंतर तो एकदिवसीय मालिकेत संघात पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. परंतु, तो अजून पूर्णपणे तंदुरुस्त झाला नसल्यामुळे दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत देखील सहभागी होऊ शकणार नाही.

बीसीसीआयच्या एका विश्वसनीय सुत्राने माहिती दिली की, “रोहित शर्माचे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅब चांगल्या प्रकारे चालू आहे. तो वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेपर्यंत ठीक होईल, अशी आशा आहे. अजून यासाठी आतापासून बराच कालावधी आहे. कारण, विंडीज संघाविरुद्ध पहिला सामना सहा फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये खेळला जाईल.”

दरम्यान, दक्षिण अफ्रिका दौऱ्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजसोबत तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी२० मालिका खेळणार आहे. वेस्ट इंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका सहा ते १२ फेब्रुवारीदरम्यान, तर टी-२० मालिका १५ ते २० फ्रब्रुवारी या काळात खेळली जाईल.

एकदिवसीय संघाचे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर रोहित त्याच्या पहिल्या एकदिवसीय मालिकेला मुकला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रोहित अनुपस्थित असल्यामुळे  केएल राहुल (Kl rahul) संघाचे नेतृत्व करणार आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना १९ जानेवारीला खेळला जाणार आहे. माजी कर्णधार विराट कोहली (virat kohli) या मालिकेत केएल राहुलच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या –
बुमराहने आणला कर्णधारपद प्रकरणात जबरदस्त ट्विस्ट; नेतृत्व करण्याची व्यक्त केली इच्छा

कर्णधार म्हणून विराटने केलेल्या चार ‘अक्षम्य चुका’; ज्याची भारतीय संघाला चुकवावी लागली जबर किंमत

अगग! राहूल कर्णधार बनताच वयाच्या २२ व्या वर्षीच ‘या’ स्टार क्रिकेटरच्या कसोटी कारकिर्दीवर लागणार ब्रेक

व्हिडिओ पाहा –


Next Post
Photo Courtesy: Twitter/BCCI

"हा विराटने बनविलेला संघ, त्यामुळे..." विश्वविजेत्या खेळाडूची रोचक प्रतिक्रिया

ganguly shah

गांगुली-शहा जोडी होणार बीसीसीआयमधून पायउतार? महत्त्वाच्या कारणाचा झाला खुलासा

Photo Courtesy: Twitter/Pro Kabaddi

९० गुणांच्या सामन्यात युपीची पलटनवर सरशी! मात्र, युवा अस्लम-मोहितने जिंकली मने

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143