भारतीय संघाचा माजी कर्णधार, बंगाल क्रिकेट असोशिएशनचा अध्यक्ष आणि बीसीसीआयच्या तांत्रिक समितीचा प्रमुख सौरव गांगुलीने भारतात डे-नाईट कसोटी होण्यासाठी बीसीसीआयच्या दिल्ली येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत मुद्दा उपस्थित केला.
आजकाल भारतासारख्या क्रिकेटप्रेमी देशातही चाहत्यांनी कसोटी क्रिकेटकडे तोंड फिरवले आहे. अगदी कोलकाता कसोटीत ४२ लाख, नागपूर कसोटीत ४९ लाख आणि दिल्ली कसोटीत १ कोटी रुपये तिकिटांच्या रूपात मिळाले आहेत.
अनेक सामन्यांना मैदाने संपूर्ण रिकामी दिसत आहे. असे असताना बीसीसीआयने डे-नाईट कसोटीचा विचार करावा असे मत गांगुलीने मांडले आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार बीसीसीआयच्या बैठकीत यावर बऱ्याच सदस्यांनी गांगुलीच्या मताला दुजोरा दिला परंतु भारतीय संघ व्यवस्थापनाने यावर काहीही स्पष्ट भूमिका घेतली नाही.
गेल्यावर्षी गांगुलीमुळेच दुलीप ट्रॉफी सामने डे-नाईट स्वरूपात खेळवले गेले होते.
गांगुलीला वाटते की प्रेक्षकांनी मैदानावर येऊन सामने पाहावे म्हणून तो याबद्दल सकारात्मक आहे असे या बैठकीतील एक सदस्याचे म्हणणे आहे.