---Advertisement---

ध्रुव जुरेलची तुलाना धोनीशी केलेल्या वक्तव्यावर सौरव गांगुली म्हणाला, ‘धोनीला धोनी बनायला 15 वर्षे लागली

On: शुक्रवार, मार्च 1, 2024 11:46 AM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना हा 7 मार्चपासून हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम धर्मशाला येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. याबरोबरच भारतीय संघ 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 अशा फरकाने आघाडीवर आहे.

याबरोबरच भारतीय फलंदाज ध्रुव जुरेलने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. त्यानंतर राजकोट कसोटीत पहिल्या डावात 104 चेंडूत 46 धावांची खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या डावात खेळाडूला फलंदाजीची संधी मिळाली नाही. त्यानंतर चौथ्या कसोटी सामन्यात कर्णधार आणि ध्रुवच्या शानदार खेळीने  भारताला रांची कसोटीत विजयाकडे नेले होते. तसेच या सामन्याच्या पहिल्या डावात ध्रुवने 149 चेंडूत 90 धावांची खेळी केली होती. यावर भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी या खेळाडूची महेंद्रसिंग धोनीशी तुलना केली होती. यावर माजी दिग्गज सौरव गांगुलीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

चौथ्या कसोटी सामन्यात ध्रुवच्या या दोन डावांमुळे भारताने विजय मिळवला होता. त्यामुळे सुनील गावस्कर या खेळाडूचे कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत आणि त्याची तुलना महेंद्रसिंग धोनीशी केली होती. हा खेळाडू एक यष्टिरक्षक फलंदाज आहे आणि त्याने दबावाखाली चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळेच त्याला ध्रुवमध्ये धोनीची प्रतिमा दिसते असे गावस्कर म्हणाले. आता गावस्करच्या वक्तव्यावर सौरव गांगुली म्हणाला की, महेंद्रसिंग धोनीला स्वतः महेंद्रसिंग धोनी व्हायला 20 वर्षे लागली होती.

https://twitter.com/dhruvjurel21/status/1762824582883688473

दरम्यान, एका डावातील चांगल्या कामगिरीमुळे धोनीशी कोणत्याही खेळाडूची तुलना होऊ शकत नाही, असे तो हावभावात म्हणाला, हे गांगुलीच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. तसेच तो म्हणाला की धोनी वेगळ्या स्तराचा खेळाडू होता, धोनीची बरोबरी कोणताही खेळाडू करू शकत नाही. ध्रुवकडे चांगली प्रतिभा आहे आणि त्याने दबावाखाली चांगली कामगिरी केली आहे.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---