भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचा बीसीसीआयमध्ये आपल्या पदावर कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या दोघांनाही पुढील तीन वर्षे बीसीसीआयचे अध्यक्ष व सचिव म्हणून राहता येणार आहे.
#Breaking: #SupremeCourt accepts #BCCI amendments of cooling off period for office bearers to kick in after two terms. #cricket #CricketTwitter https://t.co/pbYRPJZcZd
— Bar and Bench (@barandbench) September 14, 2022
बीसीसीआयच्या घटनेतील बदलाबाबत सुमारे तीन वर्षांपूर्वी दाखल करण्यात आलेल्या अपीलवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला. सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला त्यांच्या घटनेत सुधारणा करण्यास परवानगी दिली आहे. आता या बदलानंतर बोर्ड अधिकार्यांचा कार्यकाळ आणि कूलिंग पीरियड यासंबंधीचे जुने नियम शिथिल केले जातील. त्यामुळे कोणताही पदाधिकारी बीसीसीआय किंवा राज्य क्रिकेट असोसिएशनमध्ये सलग सहा वर्षे राहू शकतो.
सुमारे तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणावर बुधवारी (14 सप्टेंबर) अंतिम निकाल दिला गेला. अखेरच्या सुनवाईत न्यायालयाने बीसीसीआयचे अपील स्वीकारले आणि अधिकाऱ्यांच्या कार्यकाळाबाबत बोर्डाने सुचविलेल्या सुधारणांवर शिक्कामोर्तब केले. यामुळे गांगुली आणि शाह यांना तत्काळ प्रभावाने त्यांच्या संबंधित पदावर आणखी तीन वर्षे कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
2013 मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर जस्टीस लोढा समितीने बीसीसीआयमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचे सुचविले होते. त्यानुसार तीन वर्षाच्या एका कार्यकाळानंतर दोन वर्षाचा कुलिंग ऑफ पिरियड म्हणजे विश्रांती काळ असणे अनिवार्य केले होते. मात्र, गांगुली व शाह हे आपला कार्यकाळ वाढवण्याबाबत इच्छुक असल्यानंतर, बिहार क्रिकेट संघटनेच्या आदित्य वर्मा यांनी सुप्रीम कोर्टात अपील केले होते. यामध्ये बीसीसीआयने सदर नियम बदलून सहा वर्षाचा कार्यकाळ करण्याबाबत सुचविलेले. आता हा निकाल बीसीसीआयच्या बाजूने लागल्याने शहा व गांगुली आणखी तीन वर्ष आपल्या पदावर राहतील हे नक्की झाले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! संघनिवडीच्या बैठकीत संजूचे नावही घेतले नाही; बीसीसीआय अधिकाऱ्याचा खुलासा
जेव्हा ‘बॉल आउट’द्वारे भारताने पाकिस्तानला दिला होता धोबीपछाड, 3-0ने जिंकला होता सामना
आयपीएल 2023पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठी घडामोड! जयवर्धनेंचा प्रशिक्षकपदावरून राजीनामा, कारण…






