आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघाने दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू आणि भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांची मुख्य प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे.
त्यांची ही नियुक्ती बेंगलोरचा प्रशिक्षक डॅनियल विट्टोरीच्या जागेवर करण्यात आली आहे. विट्टोरी हा बेंगलोर संघाशी सुरुवातीला खेळाडू आणि 2014 पासून प्रशिक्षक म्हणून गेले आठ वर्षे जोडलेला होता.
आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून कर्स्टन यांना असलेल्या अनुभवामुळे बेंगलोरने ही नियूक्ती केली आहे. तसेच ते 2018 च्या आयपीएल मोसमात बेंगलोर संघाचे फलंदाजी प्रशिक्षकही होते.
https://twitter.com/RCBTweets/status/1035146123843842049
कर्स्टन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघाचे प्रशिक्षक असताना या दोन्ही संघांना कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवून दिलेले आहे. या बरोबरच 2011 साली भारताच्या विश्वचषक विजयातही त्यांचा प्रशिक्षक म्हणून मोलाचा वाट होता.
त्याचबरोबर आयपीएलमध्ये प्रशिक्षक असण्याचा त्यांचा ही पहिलीच वेळ नसून त्यांनी याआधी 2014 आणि 2015 च्या आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रशिक्षक पद भूषवले आहे.
त्यांनी 2014ला दिल्ली डेअरडेव्हिल्ससोबत 3 वर्षांचा प्रशिक्षक पदासाठी करार केला होता, परंतु 2014 आणि 2015 मध्ये दिल्ली संघ गुणतालिकेत अनुक्रमे आठवा आणि सातवा राहिला त्यामुळे त्यांना 2015 नंतर प्रशिक्षक पदावरून हटवण्यात आले.
तसेच त्यांनी 2017 मध्ये बीगबॅश लीगमधील होबार्ट हरिकेन्स संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.
बेंगलोर संघाचे अध्यक्ष संजीव चुरीवाला यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की “मागील आयपीएल मोसमात गॅरी यांनी अनुभवी आणि तरुण अशा दोन्ही खेळाडूंना चांगले मार्गदर्शन करुन स्वत:ला सिद्ध केले आहे. आम्हाला विश्वास आहे की ते संघात नवीन दृष्टीकोन देतील.”
या नियुक्तीबद्दल कर्स्टन यांनी बेंगलोरच्या संघ व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत.
तसेच 4 वर्ष बेंगलोरचे प्रशिक्षक पद सांभाळलेला विट्टोरी म्हणाला, “रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर बरोबर खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून घालवलेल्या 8 वर्षामबद्दल मी कृतज्ञ आहे. तसेट संघाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.”
बेंगलोर हा संघ आयपीएलच्या सर्व 11 मोसमात खेळलेल्या संघापैकी एक संघ आहे. परंतू त्यांना अजून एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. त्यांच्यासाठी 2018चा मोसमही त्यांच्यासाठी निराशाजनक होता. त्यांना 14 पैकी 6 सामन्यात विजय तर 8 सामन्यातील पराभवासह गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक RCBTweetsपेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–पहिल्या १० मिनीटांतच विराटच्या नावावर ५ विक्रम
– बरोबर ५० वर्षांपुर्वी या खेळाडूने एकाच षटकात मारले होते ६ षटकार
– याच दिवशी ७ वर्षांपुर्वी द्रविडने घेतला होता क्रिकेटमधील सर्वात मोठा निर्णय
– वाढदिवस विशेष- जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी