भारतीय क्रिकेट संघाला अनेक दिग्गज प्रशिक्षक आत्तापर्यंत लाभले आहेत. पण त्यातील गॅरी कर्स्टन यांचे स्थान भारतीय क्रिकेटसाठी खास राहिले. कर्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ २००९ साली कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला होता. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने २०११ साली दुसऱ्यांदा वनडे विश्वचषक जिंकला. कर्स्टन यांनी ग्रॅग चॅपेल यांच्या वादग्रस्त कारकिर्दीनंतर भारतीय संघाच्या मार्गदर्शनाची धूरा हाती घेतली होती. त्यांचा आज (23 नोव्हेंबर) 55वा वाढदिवस.
कर्स्टन भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक असताना त्यावेळीचा भारताचा कर्णधार एमएस धोनीशी त्यांची चांगली मैत्री झाली. त्यांचे संबंध चांगले राहिल्याने भारतीय संघासाठीही ही गोष्ट फायद्याची ठरली. धोनीबरोबरील चांगल्या संबंधाबद्दल कर्स्टन यांनी काही महिन्यांपूर्वी भाष्य केले होते, त्यावेळी एक खास आठवणही सांगितली होती.
एका यूट्यूब चॅनलच्या ‘आरके’ शोमध्ये बोलताना गॅरी कर्स्टन म्हणाले, “मी बर्याच वेळेस सांगितले आहे, मी भेटलेल्या सर्वांत प्रभावी व्यक्तींपैकी धोनी एक आहे. तो एक महान कर्णधार आहे. पण मला वाटते की तो एकनिष्ठ आहे आणि हीच सर्वात महत्वाची गोष्ट आहे.”
ते पुढे म्हणाले, “मी कधीच विसरणार नाही, विश्वचषक होण्यापूर्वी आम्ही बंगळुरुमध्ये होतो आणि तेथील फ्लाइट स्कूलमध्ये जाण्याचे आमंत्रण आले होते. आमच्या सपोर्ट स्टाफमध्ये काही परदेशी व्यक्ती होत्या. सकाळी परत जाण्यापूर्वी आम्हाला तेथे संपूर्ण संघाला जायचे होते आणि प्रत्येकजण तेथे जाण्यासाठी उत्सुक होता.”
“या सपोर्ट स्टाफमध्ये पॅडी ऍप्टन, एरिक सिमन्स आणि मी असे दक्षिण आफ्रिकेचे तीन सदस्य होते. आम्हाला तिघांनाही फ्लाइट स्कूलमध्ये प्रवेशासाठी परवानगी नव्हती, कारण सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ते सुरक्षित समजले जात नव्हते.”
“त्यामुळे एमएसने ती पूर्ण ट्रिपच रद्द केली. तो म्हणाला, ‘हे माझे लोक आहेत, जर त्यांना परवानगी नसेल तर आपल्यापैकी कोणीही जाणार नाही,’ तो ज्यासाठी ओळखला जातो, तेच त्याने केले.”
याबरोबरच धोनीबरोबर असलेल्या संबंधाबद्दल कर्स्टन म्हणाले, “तो (धोनी) माझ्याशी खूप एकनिष्ठ होता. आम्ही नेहमीच जिंकत नव्हतो, आमच्यावर काही कठीण वेळही आली. पण आम्ही नेहमी संघाला पुढे नेण्याविषयी एकमेकांशी बोलायचो. एकत्र काम करत असताना आमच्यात चांगली मैत्री झाली.”
कर्स्टन यांची डिसेंबर २००७ ला भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती. ते एप्रिल २०११ पर्यंत भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. याच काळात धोनीनेही कर्णधार म्हणून मोठे यश मिळवले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
युझवेंद्र चहलला ग्लेन फिलिप्सने मारलेला षटकार व्हायरल, स्टेडियमच्या छतावर पोहोचवला चेंडू
गोव्यात युवराजने ‘असं’ काय केलं, ज्यामुळे राज्य सरकाराने पाठवली नोटीस? वाचा बातमी