टी20 विश्वचषक (T20 World Cup) सुरू होण्यास काही दिवसांचाच अवधी शिल्लक आहे. अशातच काही संघाचे खेळाडू दुखापतग्रस्त झाले तर काहींच्या प्रशिक्षकांनी थेट राजीनामा दिला आहे. नेदरलॅंड्स संघाच्या ताफ्यात मात्र आंनदाचे वातावरण आहे, कारणच तसे आहे. नेदरलॅंडने टी20 विश्वचषकासाठी आपल्या कोचिंग स्टाफमध्ये विश्वचषक विजेत्या खेळाडूला जोडले आहे.
भारताला 2011मध्ये विश्वचषक जिंकून देणारे आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी सलामीवीर गॅरी कस्टर्न (Gary Kirsten) हे नेदरलॅंड्सच्या प्रशिक्षकांमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्याबरोबरच ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू डॅन क्रिश्चियन हा पण नेदरलॅंड्सच्या खेळाडूंना प्रशिक्षण देताना दिसणार आहे.
केएनबीसीचे उच्च प्रदर्शक रोलांड लेफेबरे यांनी म्हटले, “आम्ही टी20 विश्वचषकासाठी कोचिंग स्टाफमध्ये गॅरी कस्टर्न आणि डॅन क्रिश्चियन यांचे स्वागत करतो. त्या दोघांकडे अनुभव असून ते आम्हाला टी20 विश्वचषकात सहकार्य करतील.”
यावेळी कस्टर्न म्हणाले, “केपटाऊनमध्ये डच संघासोबत काम करताना मला चांगले वाटले. त्यांच्यासोबत टी20 विश्वचषकात सामील होण्यास मी खूप उत्सुक आहे. त्यांचे कौशल्य पाहून ते विश्वचषकासाठी तयार आहेत.”
कस्टर्न हे मुख्य प्रशिक्षक म्हणून तीन टी20 विश्वचषकाचा भाग राहिले आहेत. त्यांनी 2009 आणि 2010मध्ये भारत आणि 2012मध्ये दक्षिण आफ्रिके या संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडली आहे, मात्र त्यांच्या प्रशिक्षण कार्यकाळादरम्यान दोन्ही संघ उपांत्य फेरीपर्यंत देखील पोहोचले नाही. तसेच त्यांनी 2011च्या वनडे विश्वचषकातही भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडली आहे. तेव्हा भारताने तब्बल 28 वर्षानंतर वनडे विश्वचषक जिकंला होता.
कस्टर्न हे आयपीएलमध्येही होते. त्यांनी गुजरात टायटन्सच्या फलंदाजी प्रशिक्षक पद भुषविले होते. त्यावेळी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली संघाने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.
डॅन क्रिश्चियन याची कामगिरी पाहिली तर त्याने ऑस्ट्रेलियासाठी 2010, 2012 आणि 2014 टी20 विश्वचषक खेळले आहेत. तसेच मागील टी20 विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला तेव्हा तो राखीव खेळाडूंचा भाग होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकेकाळी मॅगी खाऊन ढकलत होता दिवस; आज मनगटावर १ कोटीचं घड्याळ
फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया -2022 स्पर्धा: सहभागी संघांची ओळख