पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेनेखाली होत असलेल्या डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा मानांकन अजिंक्यतपद टेबल टेनिस स्पर्धेत 18 वर्षाखालील मुलांच्या गटात नवव्या मानांकीत गौरव लोहापत्रेने दुस-या मानांकीत आरुष गलपल्लीचा तर मुलींच्या गटात अव्वल मानांकीत पृथा वर्टीकर दुस-या मानांकीत स्वप्नाली नराळेचा पराभव करत विजेतेपद संपादन केले. प्रौढ गटात अविनाश जोशीने दिलीप कुडतरकरचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
पीवायसी क्लबच्या कम्युनिटी हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत 18 वर्षाखालील मुलांच्या अंतिम फेरी नवव्या मानांकीत गौरव लोहापत्रेने आपल्या खेळात सातत्य राखत दुस-या मानांकीत आरुष गलपल्लीचा 7-11, 11-5,11-4, 11-9, 8-11, 11-6 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
17 वर्षीय गौरव हा बीएमसीसी महाविद्यालयात वाणिज्य शाखेत 12वी इयत्तेत शिकत असून स.प.महाविद्यालय इंडिया खेलेगा येथे प्रशिक्षक शिवम चुनेजा आणि संदिप गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे हे या वर्षातील दुसरे विजेतेपद आहे.
मुलींच्या गटात अव्वल मानांकीत पृथा वर्टीकरने आपल्या लौकीकाला साजेसा खेळ करत दुस-या मानांकीत स्वप्नाली नराळेचा 11-9, 11-2, 8-11, 11-5, 11-7 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
पृथा पीईएस मॉडर्न हायस्कुल येथे सातव्या इयत्तेत शिकत असून पृथाचे हे या वर्षातील तिसरे विजेतेपद आहे. ती रेडीयन्स स्पोर्टस् अकादमी येथे रोहीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
प्रौढ गटात अविनाश जोशीने दिलीप कुडतरकर याचा 15-13, 11-8, 11-8 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
महिला एकेरी गटात उपांत्यपूर्व फेरीत ईशा जोशी, श्रुती गभाने, वैभवी खेर व प्रितिका सेनगुप्ता यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 18 वर्षाखालील-मुले अंतिम फेरी
गौरव लोहापत्रे(9)वि.वि.आरुष गलपल्ली(2) 7-11, 11-5,11-4, 11-9, 8-11, 11-6
18 वर्षाखालील मुली- अंतिम फेरी
पृथा वर्टीकर(1)वि.वि.स्वप्नाली नराळे(2)11-9, 11-2, 8-11, 11-5, 11-7
प्रौढ गट(60वर्षावरील): अंतिम फेरी:
अविनाश जोशी वि.वि.दिलीप कुडतरकर 15-13, 11-8, 11-8.
महिला एकेरी गट: उपांत्यपूर्व फेरी:
ईशा जोशी(1)वि.वि.स्वप्नाली नराळे(8) 12/10,11/13,11/8,11/7,4/11,11/5
श्रुती गभाने(4)वि.वि.वेदिका भेंडे(12) 14/12,11/8,9/11,11/7,13/11
वैभवी खेर(11)वि.वि.फौजिया मेहेरली(3) 11/2,11/7,11/9,11/8
प्रितिका सेनगुप्ता(7)वि.वि.नेहा महांगडे 11/8,11/13,11/9,11/6,11/5
पुरुष गट: दुसरी फेरी:
सनत बोकील(1)वि.वि.भूषण पुजारी 11/6,11/8,11/6
श्रीयश भोसले(16)वि.वि.मिथिलेश पंडित 11/7,11/2,11/5
दीपेश अभ्यंकर(7)वि.वि.संजय भट 11/7,11/5,11/9
अजय कोठावले(5)वि.वि.अमित क्षत्रिय 11/3,11/3,11/6
हरीश साळवी(12)वि.वि.सागर कुलकर्णी 11/4,11/7,11/4
प्रसाद बुरंडे(13)वि.वि.संबीत प्रधान 8/11,11/4,11/6,11/3
सुयोग पाटील(4)वि.वि.ओंकार कडूकर 11/7,11/6,11/9
रिषभ सावंत(3)वि.वि.गुरू नाडगौडा 11/2,11/8,11/13,11/6
आर्यन पानसे(14)वि.वि.निश्चय दिमान 11/6,11/7,11/8
आदर्श गोपाळ(10)वि.वि.जॉयजीत पाल 11/8,11/6,11/9
रजत कदम(6)वि.वि.पूरब जैन 11/6,11/9,11/8
धनंजय बर्वे(8)वि.वि.विवेक सावंत 11/9,11/8,11/1
अद्वैत ब्रह्मे(11)वि.वि.सचिन धारवाटकर 7/11,11/8,11/3,11/5
करण कुकरेजा(15)वि.वि.बसवराज साबरड 11/9,11/13,11/5,11/6
वैभव दहीभाते(2)वि.वि.आर्या शेठ 11/7,11/6,7/11,11/7
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–अखेर कोहलीच्या टीम इंडियाने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडला पाजले पाणी
–कसोटी सामन्यात संपुर्ण दिवसात टाकले गेले होते केवळ दोन चेंडू
-एशियन गेम्स: १६वर्षाच्या सौरभने पराभूत केले विश्वचॅम्पियन आणि ऑलिंपिक विजेत्यांना