न्यूझीलंड संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने न्यूझीलंड संघाचा ३-० ने धुव्वा उडवला. तसेच हे दोन्ही संघ आता २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आमने-सामने येणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना २५ नोव्हेंबर रोजी कानपूरच्या ग्रीनपार्कवर पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण आणि गौतम गंभीर यांनी कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेवर निशाणा साधला आहे.
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहे. सतत फ्लॉप ठरत असून सुद्धा त्याला भारतीय संघात स्थान दिले जात आहे. त्यामुळे गौतम गंभीर आणि इरफान पठाण यांनी जोरदार टीका करत, अजिंक्य रहाणेला नशिबामुळे संघात स्थान मिळत आहे, असे म्हटले आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत अजिंक्य रहाणेला धावांचा पाऊस पाडण्यात अपयश आले होते. सतत फ्लॉप ठरत असल्यामुळे अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोन्ही फलंदाजांवर जोरदार टीका होऊ लागली आहे.
याबाबत बोलताना माजी भारतीय फलंदाज गौतम गंभीरने म्हटले की, “मला वाटते की रहाणे खूप नशीबवान आहे. तो संघाचे नेतृत्व करतोय आणि त्यामुळेच कदाचित तो संघात टिकून आहे. त्याने इंग्लंड दौऱ्यावर ज्याप्रकारे कामगिरी केली होती. त्यानंतरही तो संघात टिकून आहे ही मोठी गोष्ट आहे.”
तसेच इरफान पठाणने देखील म्हटले आहे की, “रहाणेच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल आणि आशा आहे की तो चांगली कामगिरी करेल.”
भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना २५ नोव्हेंबर पासून कानपूरच्या ग्रीनपार्क मैदानावर पार पडणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेला देण्यात आले आहे. तर दुसरा कसोटी सामना मुंबईमध्ये पार पडणार आहे. या सामन्यात विराट कोहलीचे पुनरागमन होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘चहल २०२२ टी२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार’, दिग्गज भारतीय यष्टीरक्षकाचा विश्वास
फिनिशर वॉचिंग फिनिशर! तमिळनाडूच्या शाहरुख खानचा विजयी षटकार धोनी पाहिला लाईव्ह, फोटो तुफान व्हायरल
असं कोण बाद होतं? दोन वेळा चेंडू अडवण्याचा केला प्रयत्न, तरी फलंदाज झाला हिटविकेट; पाहा व्हिडिओ