---Advertisement---

‘चहल २०२२ टी२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार’, दिग्गज भारतीय यष्टीरक्षकाचा विश्वास

On: मंगळवार, नोव्हेंबर 23, 2021 11:00 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ३-० ने विजय मिळवला. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात युझवेंद्र चहलला संघात स्थान देण्यात आले होते. या सामन्यातून त्याने भारतीय संघात पुनरागमन केले. नुकताच संपन्न झालेल्या आयसीसी टी २० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठी त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले नव्हते.

आता भारतीय यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने असा विश्वास व्यक्त केला आहे की, ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या २०२२ टी२० विश्वचषक स्पर्धेत युझवेंद्र चहलला भारतीय संघात स्थान मिळेल.

याबाबत दिनेश कार्तिकने क्रिकबजशी बोलताना म्हटले की, “त्याला पुनरागमन करताना पाहून बरे वाटले. ज्याप्रकारे त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात गोलंदाजी केली, त्यावरून तो चॅम्पियन गोलंदाज असल्याचे भासत होते. तो भारतातील सर्वोत्तम फिरकीपटू आहे. मी त्याला नेहमीच उच्च दर्जा देतो, कारण तो बुद्धिबळपटू देखील आहे आणि तो नेहमी सामान्य लोकांपेक्षा काही पावले पुढे असतो. त्याच्याकडे चांगली कौशल्ये, चांगली विविधता आहे. तो एक धाडसी गोलंदाज आहे. आयपीएल स्पर्धेत त्याचा दर्जा वाढला आहे.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “मला खात्री आहे की, चहल ऑस्ट्रेलियाला जाणार आणि मला माहित आहे की, रोहित शर्माला त्याच्यावर खूप विश्वास आहे. मैदानाबाहेरच नव्हे तर मैदानात देखील त्यांच्यात एक घट्ट नातं आहे.”

चहलला न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी २० सामन्यात प्लेइंग ईलेव्हेनमध्ये स्थान देण्यात आले होते. या संधीचा फायदा घेत त्याने मार्टिन गप्टीलला बाद करत माघारी धाडले होते. त्याने यापूर्वी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत खेळला होता. त्यानंतर झालेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत त्याला स्थान देण्यात आले नव्हते.

महत्त्वाच्या बातम्या – 

फिनिशर वॉचिंग फिनिशर! तमिळनाडूच्या शाहरुख खानचा विजयी षटकार धोनी पाहिला लाईव्ह, फोटो तुफान व्हायरल

असं कोण बाद होतं? दोन वेळा चेंडू अडवण्याचा केला प्रयत्न, तरी फलंदाज झाला हिटविकेट; पाहा व्हिडिओ

जेव्हा गॅरी कर्स्टनसाठी धोनीने रद्द केली होती टीम इंडियाची ट्रीप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---