---Advertisement---

गौतम गंभीरने केली नव्या टी२० लीगची घोषणा, खेळाडूंना मिळणार ‘या’ सुविधा

On: मंगळवार, ऑगस्ट 10, 2021 2:05 AM
---Advertisement---

कोरोना महामारीमुळे भारताच्या देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम सध्या बंद आहे. परंतु, देशभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असताना, दिल्लीमध्ये एक नवी टी२० लीग आयोजित करण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर व पूर्व दिल्लीचा खासदार गौतम गंभीरने याबाबतची घोषणा केली असून, लवकरच ही नवीकोरी लीग सुरु करण्याच्या हालचाली सुरू होतील.

ही असेल नवी स्पर्धा
भारताने जिंकलेल्या दोन विश्वचषक संघाचा सदस्य व सध्या पूर्व दिल्ली येथून खासदार असलेला गौतम गंभीर याने दिल्लीमध्ये क्रिकेटच्या वाढीसाठी व नव्या खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून नव्या टी२० लीगची घोषणा केली. ईस्ट दिल्ली प्रीमियर लीग असे या लीगचे नाव असेल. या लीगमध्ये पूर्व दिल्लीतील १० विधानसभा मतदारसंघातील संघ खेळतील.

जंगपुरा, ओखला, त्रिलोकपुरी, कोंडली, पटपडगंज, लक्ष्मीनगर, विश्वासनगर, शहादरा, कृष्णानगर व गांधीनगर येथील खेळाडूंच्या ट्रायल घेऊन अंतिम संघ निवड केली जाईल. खेळाडू निवडीची जबाबदारी भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या तीन खेळाडूंवर सोपवण्यात आली आहे. स्पर्धेतील सर्व सामने यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे खेळविण्यात येतील. ऑक्‍टोबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सुरू होऊन ही स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात समाप्त होईल.

खेळाडूंसाठी असेल मोठे व्यासपीठ
या स्पर्धेच्या घोषणा वेळी बोलताना गंभीर म्हणाला, “या लीगमध्ये १७ ते ३६ वर्षापर्यंतचे खेळाडू सहभागी होऊ शकतात. खेळाडूंच्या निवडीची जबाबदारी तीन आंतरराष्ट्रीय खेळाडूंवर दिली गेली आहे. ट्रायल्सनंतरच सर्व खेळाडूंची निवड होईल. खेळाडू केवळ आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या संघातूनच खेळेल.”

संघांबाबत बोलताना गंभीर म्हणाला, “प्रत्येक संघ खरेदी करण्यासाठी एक आधारभूत किंमत लागेल. प्रायोजक आणि इतर मार्गाने येणारा पैसा खेळाडूंवर खर्च करण्यात येईल. हे खेळाडूंसाठी मोठे व्यासपीठ असेल. यामधून पुढे येणाऱ्या खेळाडूंना आणखीन मोठ्या सुविधा प्राप्त करुन दिल्या जातील.”

आयपीएलच्या धर्तीवर होणाऱ्या या स्पर्धेत प्रायोजक, जर्सी व मेंटर या सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएल २०२१ साठी बीसीसीआयचे सूक्ष्म नियोजन, ‘असे’ असतील बायो-बबलचे नवीन नियम

दिनेश कार्तिक आता तमिळनाडूकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत नाही, ‘हा’ खेळाडू आहे त्याला कारण

शुभमंगल सावधान! न्यूझीलंडचा कोरी अँडरसन चढला बोहल्यावर; लग्नानंतर आता ‘या’ देशात खेळणार क्रिकेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---