---Advertisement---

विराटने केपटाऊन कसोटीत पुनरागमन केल्यास ‘या’ दिग्गजाला प्लेइंग इलेव्हनमधून द्या डच्चू, गंभीरचा सल्ला

On: शुक्रवार, जानेवारी 7, 2022 12:26 PM
Team India
---Advertisement---

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना खेळू शकला नाही. कोहलीच्या जागी केएल राहुल याच्याकडे संघाच्या नेतृत्त्वाची कमान सोपवण्यात आली होती. विराट कोहलीच्या अनुपस्थितीमुळे चाहत्यांची चिंता वाढली होती, मात्र त्यानंतर बुधवारी (५ जानेवारी) कोहली संघासोबत सराव करताना दिसला.

दुसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने मैदानावर काहीवेळ स्ट्रेचिंग केले, त्यानंतर त्याने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत थ्रोडाऊनचा सराव केला होता. सेंच्युरियन कसोटीत कोहलीने आपली 98वी कसोटी खेळली होती, आता कोहली लवकरच 100 कसोटी सामने खेळण्याची संधी मिळू शकते.

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने हनुमा विहारीला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवण्याचा, तर अजिंक्य रहाणेला संघातून वगळण्याचा सल्ला दिला आहे स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गौतम गंभीर म्हणाला, “हनुमा विहारीला संघात कामय करणे ही योग्य चाल असेल. अजिंक्य रहाणेने काय कामगिरी केली, हे आपण बरेच दिवस पाहिले आहे. माझा विश्वास आहे की, जर विराट कोहली तिसऱ्या कसोटीत परतला, तर त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी आणि हनुमा पाचव्या क्रमांकावर खेळेल.”

अधिक वाचा – लेकीच्या वाढदिवशी सुरू होणाऱ्या कसोटीपूर्वी विराटची जोरदार तयारी, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

हनुमा विहारीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात 20 धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात तो शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि 6 चौकारांच्या मदतीने 40 धावा जोडल्या. यादरम्यान विहारीने खालच्या फळीतील फलंदाजांसोबत भागीदारीही केली.

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली कसोटी 113 धावांनी जिंकली. दुसरी कसोटी जिंकण्यासाठी भारताने दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेला 240 धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने सामन्याच्या चौथ्या दिवशी 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. त्यामुळे मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. आता

व्हिडिओ पाहा – डकवर्थ लुईस नियमाला पर्याय ठरणारी भारतीय पद्धत

या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 11 ते 15 जानेवारी दरम्यान केपटाऊनमध्ये खेळवला जाईल. हा सामना जो संघ जिंकेल, तो संघ मालिकाही आपल्या नावावर करेल. या कसोटी मालिकेनंतर दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“हार्दिक पंड्याकडून ज्या अपेक्षा करत होतो, त्या शार्दुल ठाकूर पूर्ण करत आहे”

सूर्यकुमार यादवच्या पोस्टवर पतीसाठी रितिकाची हटके कमेंट; म्हणाली, ‘रोहितला माझ्याकडून…’

नामुष्कीजनक पराभवाचे कर्णधार राहुलने दिले ‘हे’ कारण; म्हणाला…

डकवर्थ लुईस नियमाला पर्याय ठरणारी भारतीय पद्धत । What Is VJD Method Of Cricket?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---